news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड शहराच्या विकासातील ‘दादां’चा वाटा मोठा! महापौराच्या रूपाने राष्ट्रवादीला संधी देण्याची अरुण पवार यांची अपेक्षा

शहराच्या विकासातील ‘दादां’चा वाटा मोठा! महापौराच्या रूपाने राष्ट्रवादीला संधी देण्याची अरुण पवार यांची अपेक्षा

पिंपरी-चिंचवडच्या भाग्यविधात्याचा सन्मान राखण्यासाठी महायुतीने मोठेपण दाखवावे; मराठवाडा जनविकास संघाची आक्रमक भूमिका. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘राष्ट्रवादीला महापौरपद देणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली’; अरुण पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, २९ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या महान कार्याचा सन्मान राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद देऊन मोठेपण दाखवावे,” अशी अपेक्षा मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे.

अरुण पवार यांनी म्हटले आहे की, अजित पवार हे महायुतीतील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी नेते होते. राज्याच्या राजकारणासोबतच पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक प्रगतीमध्ये, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते. शहराचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

“राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याचा सन्मान सर्वपक्षीय असायला हवा. स्व. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद दिल्यास, तो एक सकारात्मक आणि समन्वयाचा संदेश देणारा निर्णय ठरेल,” असे मतही अरुण पवार यांनी व्यक्त केले.

महायुती सरकारने असा निर्णय घेतल्यास राजकीय परिपक्वता, सलोखा आणि विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका अधोरेखित होईल. यामुळे राज्यातील नागरिकांमध्येही एक चांगला संदेश जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण पवार यांनी केलेली ही मागणी आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!