news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर! अजितदादांच्या निधनामुळे प्रचाराला लागला होता ब्रेक

निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम जाहीर! अजितदादांच्या निधनामुळे प्रचाराला लागला होता ब्रेक

पुणे, सातारा, सोलापूरसह १२ जिल्ह्यांत ९ फेब्रुवारीला मतमोजणी; बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोठी बातमी: राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर; अजितदादांच्या निधनामुळे निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात निवडणूक प्रक्रियेचे कामकाज आणि राजकीय प्रचार पूर्णपणे थांबल्याने, राज्य निवडणूक आयोगाने (SEC) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानाची आणि मतमोजणीची तारीख बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी संध्याकाळी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता नवीन तारखा खालीलप्रमाणे असतील:

  • मतदान: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०).

  • मतमोजणी: ९ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजल्यापासून).

  • प्रचाराची सांगता: ५ फेब्रुवारी २०२६ (रात्री १० वाजता).

  • राजपत्रित अधिसूचना (निकाल): ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जाईल.

यापूर्वी मतदान ५ फेब्रुवारी आणि मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि २८ ते ३० जानेवारी दरम्यान शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. या काळात उमेदवारांना प्रचार करणे आणि प्रशासनाला निवडणूक तयारी करणे शक्य नसल्याने, निवडणूक प्रक्रियेला दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही निवडणूक राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. सुमारे २५,४८२ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडेल.

आयोगाने स्पष्ट केले आहे की, आचारसंहिता निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत लागू राहील. तसेच, १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने, निवडणूक प्रक्रिया ११ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!