news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड खंबीर पाठीराखा हरपला! अजितदादांच्या अकाली निधनाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सुन्न

खंबीर पाठीराखा हरपला! अजितदादांच्या अकाली निधनाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन सुन्न

राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा; ध्वज अर्ध्यावर उतरवले, प्रशासकीय सुट्टी जाहीर करून महापालिकेत वाहिली आदरांजली. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २८ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. या दुःखद घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या लाडक्या ‘दादां’ना आदरांजली वाहिली. शहराच्या विकासात आणि प्रशासकीय कामात अजित पवार यांचे असलेले योगदान व त्यांचा शिस्तबद्ध कार्य करण्याचा दृष्टिकोन यांचे स्मरण यावेळी करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार असून कोणतेही सांस्कृतिक किंवा करमणुकीचे शासकीय कार्यक्रम होणार नाहीत. निधनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी आज प्रशासकीय सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.

या श्रद्धांजली सभप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक किशोर गोखले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, राजेश आगळे, चेतना केरूरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.

अजित पवार यांच्या जाण्याने पिंपरी-चिंचवड शहराने आपला खंबीर पाठीराखा आणि मार्गदर्शक गमावला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!