news
Home पिंपरी चिंचवड स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे व्हिजन; अनियंत्रित वाढ रोखून पिंपरी-चिंचवडला बनवणार आशियातील सर्वोत्कृष्ट शहर

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे व्हिजन; अनियंत्रित वाढ रोखून पिंपरी-चिंचवडला बनवणार आशियातील सर्वोत्कृष्ट शहर

वाहतूक कोंडी मुक्ती, ग्रीन बेल्ट आणि कोट्यवधींच्या निधीची बचत; 'प्रारूप विकास आराखडा २०२६' बाबत तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“आजचे नियोजन म्हणजे उद्याचे सुंदर शहर”; प्रारूप विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सभापती अभिषेक बारणे यांच्या नेतृत्वात वेग!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: “पिंपरी-चिंचवड शहराचा परिपूर्ण, संतुलित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासकीय तत्परता अत्यंत आवश्यक आहे. शहराचे सुवर्णभवितव्य घडवणाऱ्या या ऐतिहासिक विकास प्रवासात सर्व नागरिकांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा,” असे आवाहन प्रारूप सुधारित विकास योजना नियोजन समिती सदस्य तथा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले.

शहराची अनियंत्रित वाढ रोखून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘प्रारूप विकास आराखडा २०२६’ अत्यंत वेगाने पुढे नेला जात आहे. या पार्श्वभूमीवर सभापती अभिषेक बारणे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली निगडी प्राधिकरण येथील ग. दी. माडगूळकर प्रेक्षागृहात एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दिशादर्शक उच्चस्तरीय बैठक उत्साहात पार पडली.

बैठकीत अत्यंत सूक्ष्म व तांत्रिक बाबींचा आढावा घेत सभापती अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले की, शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना केवळ आजचा विचार न करता आगामी २० वर्षांतील लोकसंख्या आणि गरजा डोळ्यांसमोर ठेवण्यात आल्या आहेत.

शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी रुंद रस्ते, डीपी रोड, रिंग रोड, मेट्रो आणि बीआरटीएसचा (BRTS) दूरदर्शी आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरक्षित पदपथ, सायकल ट्रॅक आणि सुसज्ज वाहन पार्किंगची सोय आधीच आरक्षित करण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, मलनिसारण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन केंद्रे आणि वीज उपकेंद्रांसाठी आवश्यक जमिनीची जागा आधीच निश्चित केली आहे. यामुळे भविष्यात रस्ते रुंदीकरणासाठी घरे पाडण्याची नामुष्की टळणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या करांमधून गोळा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची बचत होणार आहे.

निवासी, व्यापारी, औद्योगिक आणि ग्रीन झोनचे स्पष्ट वर्गीकरण केल्यामुळे निवासी भागांत बेकायदेशीर कारखाने उभे राहण्याच्या समस्येला पूर्ण आळा बसेल. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नदीच्या पूररेषेच्या परिसरात अनधिकृत बांधकामांना कडक प्रतिबंध घालण्यात आला आहे.

शहराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी ‘ग्रीन बेल्ट’ अंतर्गत उद्याने व मैदानांसाठी मोठ्या प्रमाणात जागा राखीव ठेवली आहे. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये व उद्यानांचे समान वाटप करून गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भौगोलिक दरी मिटवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे.

या बैठकीत विकास योजना नियोजन समितीचे सदस्य संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, अनुपमा कुलकर्णी, तसेच निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते, उत्तरेश्वर लोंढे, दत्तात्रय पवार आणि नामांकित वास्तूरचनाकार व पर्यावरणतज्ज्ञ नथू श्रीपती शिंदे यांनी तांत्रिक पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

“शहर नियोजन हे केवळ नकाशावरील रेषा नसून पिंपरी-चिंचवडचे भविष्य उज्वल करण्याचे माध्यम आहे!”

“टाऊन प्लॅनिंग ही केवळ कागदावर नकाशे काढण्याची प्रक्रिया नसून, शहराचे उद्याचे सुवर्णभवितव्य ठरवणारा कळीचा मार्ग आहे. ‘आजचे नियोजन म्हणजे उद्याचे सुंदर शहर’ या उक्तीनुसार महापालिका आणि PMRDA चे ‘डी.पी. युनिट’ अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहे. नागरिकांनी नगररचना विभागाच्या नियमांचे पालन करून या लोकहिताच्या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करावे.”

अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती तथा सदस्य, प्रारूप सुधारित विकास योजना नियोजन समिती)

अभिषेक बारणे यांच्या या अभ्यासपूर्ण, कणखर आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजनबद्ध विकासाला नवी दिशा मिळाली असून, नागरिकांमधून त्यांच्या या दूरदृष्टीचे आणि धडक कार्यशैलीचे जोरदार स्वागत होत आहे.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!