news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कीज हॉटेलचा सत्कार

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कीज हॉटेलचा सत्कार

कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या आस्थापनेचे आरोग्य विभागाकडून कौतुक

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या आस्थापनेचे आरोग्य विभागाकडून कौतुक

पिंपरी: दि. 13 मे 2025: कचरा व्यवस्थापन आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये होम कंपोस्टिंग आणि कचरा कमी करण्यासाठी ‘रिड्यूस, रियूज आणि रिसायकल’ या पद्धतींचा अवलंब करण्याबाबत जनजागृती करत आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असल्याने त्याचा वापर टाळणे आवश्यक आहे.

महापालिका शहरातील हॉटेल, उपहारगृह आणि भोजनालयांमधील ओल्या व सुक्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्यावर काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर, मोरवाडी येथील कीज हॉटेलने कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ट काम केले आहे.

कीज हॉटेलने ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत (प्रभाग क्रमांक 10, मोरवाडी, पिंपरी) त्यांचा सत्कार करण्यात आला.

कीज हॉटेल हे महापालिका परिसरातील ‘शून्य कचरा’ संकल्पना राबवणारे पहिले हॉटेल ठरले आहे. या हॉटेलमध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळला जातो, तसेच कचरा महापालिकेच्या गाडीला न देता ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत बनवले जाते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले, “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शून्य कचरा’ मोहिमेला नागरिक आणि उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला सहकार्य करावे.”

उप आयुक्त (आरोग्य विभाग) सचिन पवार म्हणाले, “आरोग्य विभागाने सुरू केलेला शून्य कचरा जनजागृती उपक्रम प्रशंसनीय आहे, आणि नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतर उद्योगांनीही असाच सकारात्मक प्रतिसाद द्यावा.”

या सत्कार समारंभाला महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कीज हॉटेलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!