निगडी, पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): निगडीत बुद्ध जयंती उत्साहात: ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’
मिलिंद नगर येथे बुद्ध मूर्तीची स्थापना; सुदीप गायकवाड यांचे ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ या विषयावर प्रभावी व्याख्यान
निगडी येथील मिलिंद नगरमध्ये बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमात “जगाला युद्ध नको, बुद्ध हवा” या महत्त्वपूर्ण विषयावर कॅडर प्रशिक्षक आणि बसपाचे माजी महाराष्ट्र प्रदेश महासचिव आयु. सुदीपजी गायकवाड यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यासोबतच, बौद्धचार्य अमर साळवे गुरुजी यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी उंची मिळाली.
कार्यक्रमाचे आयोजन आयु. गौतम गायकवाड यांनी केले होते, तर अध्यक्षस्थान आयु. सुरज गायकवाड यांनी भूषवले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आयु. युवराज भास्कर तिकटे यांनी केले आणि आभार आयु. राहुल मदने यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयु. दयानंद बनसोडे, आयु. सर्जेराव सोनकांबळे, आयु. परमेश्वर निसरगंध, आयु. नरेंद्र सोनटक्के, आणि आयु. लहू साळुंके यांनी विशेष मेहनत घेतली.
या महत्वपूर्ण सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यात प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजनजी नायर (संस्थापक, ओप्लांजल फाउंडेशन), मा. मुकुंदजी रणदिवे (महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रिपब्लिकन सेना), मा. दिलीप कुसळे (माजी पुणे जिल्हा अध्यक्ष, बसपा), मा. प्रकाश गायकवाड (माजी पुणे जिल्हा प्रभारी, बसपा), मा. हरीश डोळस (सामाजिक कार्यकर्ते), मा. राहुलभाऊ ओव्हाळ (उद्योजक), मा. राहुल मदने (पुणे जिल्हा अध्यक्ष, मल्हार आर्मी), मा. राजेन्द्र पवार (संस्थापक, बहुजन आंदोलन), मा. रामभाऊ ठोके (राष्ट्रीय अध्यक्ष, पॅन्थर युवा मोर्चा), मा. महेंद्र सरवदे (युवा साथी), मा. अक्षय कसबे (युवक अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना), मा. माऊली बोराटे (राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी), सिद्धार्थ वनसाळी (माजी पिंपरी विधानसभा अध्यक्ष, बसपा), मा. अशोक कदम (समता सैनिक दल, कंपनी कमांडर व जिल्हा संरक्षण सचिव), मा. नाना मस्के (नेते, वंचित बहुजन आघाडी), मा. गौरीताई शेलार (टपरी पथारी कामगार संघटना अध्यक्ष), मा. प्रमोद क्षिरसागर (अध्यक्ष, लढा युथ मूव्हमेंट), मा. रमेश कांबळे, मा. खाजप्पा धोडमनी, मा. चंद्रकांत गायकवाड, मा. विकी पासोटे, मा. अमोल शेठ भिसे, तेजराव वानखेडे, जानराव साहेब, मा. गौतमभाऊ पटेकर, मा. बुद्धभूषण अहिरे, मा. प्रशांत नाटेकर, सुजित कांबळे, सागर सुर्यवंशी, विशाल मांजरे, सुजित कांबळे, आणि दत्ता गायकवाड यांच्यासह निगडी परिसरातील अनेक महिला भगिनी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयु. सुदीपजी गायकवाड यांच्या ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी भगवान बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या शिकवणुकीचे महत्त्व विशद केले. आजच्या युगात जगाला युद्धाची नाही, तर बुद्धांच्या करुणेची आणि शांततेच्या मार्गाची गरज आहे, असे विचार त्यांनी प्रभावीपणे मांडले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बौद्धाचार्य अमर साळवे गुरुजी यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना हा कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग होता. या मूर्तीच्या स्थापनेमुळे परिसरातील अनुयायांना प्रेरणा मिळेल आणि बुद्धांच्या विचारांचा प्रसार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एकंदरीत, निगडीतील बुद्ध जयंतीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. मान्यवरांची उपस्थिती आणि सुदीपजी गायकवाड यांच्या प्रभावी व्याख्यानामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
