news
Home पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चौक आता वस्ताद लहूजी साळवे चौक म्हणून ओळखला जाणार

सायन्स पार्क चौक आता वस्ताद लहूजी साळवे चौक म्हणून ओळखला जाणार

सकल मातंग समाज आणि शिवशाही व्यापारी संघाच्या प्रयत्नांना यश; कार्यकर्त्यांनी केले नामकरण

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड शहरातील सायन्स पार्कजवळील चौकाला आता आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांचे नाव देण्यात आले आहे. सकल मातंग समाज आणि शिवशाही व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे नामकरण करण्यात आले.

युवराज दाखले यांनी सांगितले की, वस्ताद लहूजी साळवे काही काळ चिंचवड परिसरात वास्तव्यास होते. ते चाफेकर बंधू आणि वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांचे गुरू होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी यासाठी या चौकाला त्यांचे नाव देणे महत्त्वाचे होते.

दाखले यांनी पुढे सांगितले की, महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आयुक्तांकडून कोणत्याही प्रस्तावाला लवकर मान्यता मिळत नाही. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही चौकाला लहूजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्यास कोणी तयार नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे नामकरण केले आहे.

शिवशाही व्यापारी संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे आणि प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य पार पडले.

या नामकरण सोहळ्याला शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि सकल मातंग समाजाचे प्रदेश समन्वयक लोकसेवक युवराज दाखले, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!