news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मावळमहाराष्ट्र अमर पाटील नवे शिवसेना जिल्हाप्रमुख!

अमर पाटील नवे शिवसेना जिल्हाप्रमुख!

शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी; दक्षिण सोलापूर, अक्कलकोटवर लक्ष केंद्रित.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सोलापूर (पंडित गवळी, मॅक्स मंथन डेली न्यूज, विशेष): अमर पाटील यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड! दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार!

अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या सोलापूर जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

अमर पाटील यांचा राजकीय प्रवास

अमर पाटील हे शिवसेनेचे एक अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज होऊन त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अमर पाटील यांच्या कामाची पद्धत, कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता आणि त्यांनी आजपर्यंत केलेली विकास कामे लक्षात घेऊन शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल.

निवडीनंतर अमर पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबईतील ‘बाळासाहेब भवन’ येथे निवडपत्र स्वीकारल्यानंतर अमर पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना सचिव संजय मोरे, संपर्कमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या सहकार्याने माझी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. आगामी काळात ‘गाव तेथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ हे ध्येय घेऊन मी काम करणार आहे. तसेच, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करेन.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याचा विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे, सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण आणि महिला आघाडीच्या अनिता माळगे, प्रियंका परांडे, संजय कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!