news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड गृहप्रकल्प भागीदाराचा विश्वासघात! फ्लॅटधारकांचे कोट्यवधी बुडाले!

गृहप्रकल्प भागीदाराचा विश्वासघात! फ्लॅटधारकांचे कोट्यवधी बुडाले!

मकरंद पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नितीन धिमधिमे यांचा गंभीर आरोप.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गृह प्रकल्प भागीदाराने केली गद्दारी! फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक; मकरंद पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी – नितीन धिमधिमे (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

फॉर्च्युन डेव्हलपर्समधील भागीदार मकरंद पांडेकडून कोट्यवधींचा घोटाळा? – नितीन धिमधिमे यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड, दि. ३० मे २०२५: आळंदी परिसरातील फॉर्च्युन हिलटॉप आणि फॉर्च्युन वेदाज या दोन गृहप्रकल्पांमध्ये फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांनी मकरंद सुधीर पांडे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. फॉर्च्युन डेव्हलपर्समधील भागीदार नितीन धिमधिमे यांनी मागणी केली आहे की, मकरंद पांडे यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा.

या संदर्भात तक्रारदार नितीन शंकर धिमधिमे यांच्यासह अनेक नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात अर्ज सादर केला आहे. अर्जात नमूद केल्यानुसार, मकरंद पांडे आणि नितीन धिमधिमे हे दोघे भागीदार असून त्यांनी एकत्रितपणे या गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, फॉर्च्युन डेव्हलपर्समधील भागीदार मकरंद पांडे यांनी बांधकाम अपूर्ण सोडले आणि मागील दोन वर्षांपासून ते प्रकल्पातून पळून गेले आहेत. त्यांचे वर्तन संशयास्पद असल्याची माहिती भागीदार नितीन धिमधिमे यांनी आज पिंपरी येथे (दि. ३०) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना धिमधिमे म्हणाले की, फॉर्च्युन हिलटॉप प्रकल्पाचे बांधकाम ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, तर फॉर्च्युन वेदाज प्रकल्पाचा पहिला टप्पा ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता. परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम पुढे सरकलेले नाही. पांडे यांनी काही काळ लोकांशी संवाद साधणेही टाळले आणि वेगवेगळी कारणे देत वेळ काढला. ते तीन कोटी रुपये घेऊन पसार झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते प्रतिसाद देत नाहीत आणि वारंवार आपले राहण्याचे ठिकाण बदलत आहेत. सदर गृहप्रकल्पांचे काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु पांडे एकत्रितपणे काम करण्यास तयार नाहीत. ते स्वतःही काम करत नाहीत आणि धिमधिमे यांनाही कामाचे अधिकार देत नाहीत. अशा प्रकारे त्यांचे ब्लॅकमेल करणे सुरू आहे.

फेसबुक लाईव्हद्वारे पांडे यांच्या गैरवर्तनाची माहिती दिल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना खरी परिस्थिती समजली. त्यानंतर झालेल्या बैठका आणि व्हॉट्सअ‍ॅप संवादातूनही पांडे यांनी कोणतेही सहकार्य केले नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी सांगितले की, पांडे यांच्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ते मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. धिमधिमे यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः आपल्या कुटुंबासोबत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नशिबाने ते वाचले.

हा वाद केवळ अंतर्गत नसून फ्लॅटधारकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या ग्राहकांनी आपली आयुष्यभराची कमाई गुंतवली आहे. बँकेचे हप्ते आणि भाडे भरूनही त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळालेले नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि श्रमिक वर्गातील लोक यात फसले गेले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने पांडे यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी धिमधिमे आणि तक्रारदार ज्ञानेश्वर सरोदे, रवींद्र इनामदार, स्वप्निल जोशी, राणी कुमारी वर्मा, मोहन वावळे, रेश्मा वावळे, संजय पाटील, विकास धिमधिमे, सुलोचना देशमुख, महेंद्र राठोड, संतोष भापकर, शंतनू पाटील, दिपाली धिमधिमे, रोहित पाटील, अमित वर्मा, विद्याधर शेलार, जयवंत पाटील, सतीश सोनवणे, आनंद बनसोडे, महेश कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, अजय कुमार पांडे, गोविंद कुमार दुर्जे, सूर्यकांत बिरदवडे, ज्योती स्वामी, तेजन जामदोटे, विजया जीवाडोटे, पुनम देशमुख, हेमंत यादव, प्रशांत यादव, एस. बी. शिंदे, सचिन डोईफोडे, दिपाली डोईफोडे यांनी सही केलेल्या पत्राद्वारे केली आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!