news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड राजमाता अहिल्यादेवी: आदर्श राज्यकर्त्या!

राजमाता अहिल्यादेवी: आदर्श राज्यकर्त्या!

जिजाऊ ब्रिगेडने केले पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राजमाता अहिल्यादेवी: शूर योद्धा, कुशल प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या! – प्रकाश जाधव (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

जिजाऊ ब्रिगेडतर्फे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

पिंपरी, दि. ३१ मे २०२५: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सती प्रथा नाकारून एक पुरोगामी विचार समाजात रुजवला. पतीच्या निधनानंतर त्या सती न जाता, सासरे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे राज्याचा कारभार सांभाळला. पती, सासरे आणि नातू अशा अनेक प्रियजनांचे निधन झाल्यावरही त्या खचल्या नाहीत, तर खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी सैन्यात महिलांची एक विशेष तुकडी तयार केली आणि शत्रूंना धूळ चारली. त्या खऱ्या अर्थाने एक शूर योद्धा, उत्कृष्ट प्रशासक आणि आपल्या प्रजेच्या हिताचे सतत रक्षण करणाऱ्या कर्तव्यदक्ष राज्यकर्त्या होत्या, असे विचार मराठा सेवा संघ शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पिंपरी येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव, जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे आणि विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले. या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या माणिक शिंदे, वृषाली साठे, कौशल्या जाधव, मंदा पांढरे, संध्या भालेराव, उर्मिला देशमुख, मोनिका भोसले, सुमित पांढरे यांसारखे अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव वृषाली साठे यांनी केले, तर विभागीय कार्याध्यक्षा माणिक शिंदे यांनी आभार मानले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? कमेंट करून नक्की कळवा!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!