news
“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप“कोणत्याही आदेशाशिवाय महिलांकडून रात्री-बेरात्री करून घेतली जातेय साफसफाई!” विजयाताई साठे यांचा कंत्राटदारांवर गंभीर आरोप; दोषींना ‘ब्लॅकलिस्ट’ करून गुन्हे दाखल करण्याची मागणी“रुग्णवाहिका आणि औषधांचा तुटवडा दूर करा!” पदमपाणी मंगलम येथे रंगला आरोग्य जनसंवाद; तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांच्याकडून अडचणी सोडवण्याचे आश्वासन“रुग्णवाहिकांना रस्ता मिळेना, पदपथांवर माफियांचा कब्जा!” वायसीएम आणि डी.वाय. पाटील रुग्णालय परिसरात अनधिकृत टपऱ्यांचा विळखा; राजकीय दबावामुळे कारवाई थंडावल्याचा ननावरे यांचा गंभीर आरोप“एका मातेचा सन्मान राखण्यासाठी राजगुरूंच्या आईने स्वतःच्या पुत्राची भेट नाकारली!” किरणजीत सिंग यांनी सांगितली लाहोरमधील ऐतिहासिक आठवण; शहीद पार्वतीबाईंच्या त्यागाला सलाम करण्यासाठीच पुणे दौरा
Home पिंपरी चिंचवड तंबाखूमुक्त कामगार: आरोग्याचा संकल्प!

तंबाखूमुक्त कामगार: आरोग्याचा संकल्प!

जागतिक तंबाखू विरोधी दिनी कामगारांची होळी आणि व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा.

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जागतिक तंबाखू विरोधी दिन: कामगारांचा व्यसनमुक्तीचा निर्धार! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

तंबाखूजन्य पदार्थांची होळी; काशिनाथ नखाते यांचे कामगारांना आवाहन.

पिंपरी, दि. ३१ मे २०२५: “अनेक कष्टकरी कामगार कामाच्या विरंगुळ्यासाठी किंवा तल्लफ आल्यावर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. या सवयीमुळे त्यांचे आरोग्य बिघडते आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे सर्व कामगारांनी तंबाखू, जर्दा, गुटखा यांसारख्या व्यसनांपासून दूर राहावे,” असे मत कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्रतर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची होळी करून कामगारांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी काही कामगारांनी आजपासूनच व्यसन न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमात कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, संघटक भास्कर राठोड, मनपा सदस्य सलीम डांगे, अनिल चव्हाण, मंगेश सावंत, खंडू कांबळे, प्रकाश इंगोले, जालिंदर कांबळे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

यावेळी बोलताना काशिनाथ नखाते म्हणाले की, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान यांचे दुष्परिणाम लगेच जाणवत नसले तरी, कालांतराने ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरतात. व्यसनामुळे शरीरात विविध रोग घर करतात आणि जेव्हा याची जाणीव होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होतात, हे दुर्दैव आहे. या पदार्थांवर कॅन्सरसारख्या रोगांचे आणि दुष्परिणामांचे चित्र तसेच इशारा छापलेला असतो, तरीही व्यसन करणारे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. कामगारांमध्ये एकत्र येऊन या विषयावर चर्चा करणे आणि व्यसनाबद्दल चीड निर्माण करणे आवश्यक आहे. समाजात व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही नखाते यांनी केले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!