news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home पिंपरी चिंचवड छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक: केवळ इतिहास नव्हे, आजच्या जीवनाची प्रेरणा!

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक: केवळ इतिहास नव्हे, आजच्या जीवनाची प्रेरणा!

प्रकाश जाधव यांचा संदेश; निगडीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचा संयुक्त कार्यक्रम! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी) Sources

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहाजीराजांच्या संकल्पनेतून, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने छ.शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले : प्रकाश जाधव!

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनी कार्यक्रमाचे आयोजन; निगडीत शिवचरित्राचा जागर! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

पिंपरी, दि. ६ जून २०२५: रयतेच्या स्वराज्य निर्मितीचा संकल्प शहाजीराजांनी केला आणि राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने तो छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केला. ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर जिजाऊंच्या उपस्थितीत राज्याभिषेक करून शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेचे स्वराज्य निर्माण केले आणि छत्रपती झाले, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या भक्ती शक्ती समूह शिल्प, निगडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

शिवराज्याभिषेक दिनी अभिवादन सोहळा

या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने भक्ती शक्ती समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे, शहराध्यक्षा सुलभा यादव आणि सचिव वृषाली साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याला मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, दिलीप गावडे, अशोक सातपुते, सयाजी भांदिगरे, धन्यकुमार जगदाळे, मंगेश चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नप्रभा सातपुते, जयंती कदम, कौशल्या जाधव, संध्या भालेराव, वंदना क्षीरसागर, शितल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, विवेक गायकवाड, साहेबराव साळुंखे, शाम पाटील, राजेश सातपुते, नितिन विधाते यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिवचरित्रातून आजही मिळते प्रेरणा

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे होते. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून महिलांशी कसे वागावे, स्वावलंबी कसे बनावे, नियोजन आणि व्यवस्थापन कसे करावे याची प्रेरणा मिळते.” त्यांचे हे विचार आजही समाजासाठी दिशादर्शक ठरतात, असे ढवळे यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण कदम यांनी मानले.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!