Home पिंपरी चिंचवड बकरी ईद निमित्त तात्पुरते वाहतूक बदल!

बकरी ईद निमित्त तात्पुरते वाहतूक बदल!

ईदगाह मैदान आणि कत्तलखाना परिसरातील मार्गांवर तात्पुरती प्रवेशबंदी जाहीर! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी चिंचवड)

by maxmanthannews@gmail.com
0 comments

बकरी ईदनिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक बदल!

चिंचवड व भोसरीतील प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे आवाहन! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी चिंचवड)

पिंपरी, ०५ जून २०२५: पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईदनिमित्त होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने महत्त्वपूर्ण वाहतूक बदलांची घोषणा केली आहे. पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी चिंचवड शहर, श्री. बापू बांगर यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकारानुसार तात्पुरत्या स्वरूपात हे आदेश निर्गमित केले आहेत. चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील ईदगाह मैदान आणि भोसरी येथील तात्पुरता कत्तलखाना परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

चिंचवड वाहतूक विभागातील बदल (दि. ०७/०६/२०२५, सकाळी ०५:०० ते १३:०० वाजेपर्यंत)

बकरी ईदनिमित्त चिंचवड येथील चाफेकर चौक येथील ईदगाह मैदानात नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येणार असल्याने, या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून)

  • मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.
    • पर्यायी मार्ग १: सदर मार्गावरील वाहतूक एसकेएफ कंपनीकडून डावे बाजूस वळुन अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
  • चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.
    • पर्यायी मार्ग १: सदर मार्गावरील वाहतूक ही चाफेकर चौक जुना जकात नाकाकडून उजवे बाजूस वळुन सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जाईल.
    • पर्यायी मार्ग २: सदर मार्गावरील वाहतूक ही चाफेकर चौककडून उजवे बाजूस वळुन अहिंसा चौककडून इच्छित स्थळी जाईल.
  • बिजलीनगर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.
    • पर्यायी मार्ग: सदर मार्गावरील वाहतूक ही हनुमान मंदिर येथून डावीकडे वळुन मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलकडून इच्छित स्थळी जाईल.

नागरिकांनी वाहतूक सुरळीत होईपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भोसरी वाहतूक विभागातील बदल (दि. ०६/०६/२०२५ ते ०७/०६/२०२५ या दोन दिवशी सकाळी ०६:०० ते २१:०० वाजेपर्यंत)

बकरी ईदनिमित्त पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्याकडे (पाळीव प्राणी चिरंतन भूमी पाठीमागे, हॉकी स्टेडियम चौक, एमआयडीसी भोसरी) ये-जा करणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. (शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच कत्तलखान्याकडे जाणारी वाहने वगळून)

  • हॉकी स्टेडियम चौकामधून गुलाब पुष्प उद्यान चौकापर्यंत जाण्या-येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी.
    • पर्यायी मार्ग १ (नेहरूनगरकडून येणारी वाहने): हॉकी स्टेडियम चौकाकडून क क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाकडे जाऊन, बीएचटीसी कंपनी समोरुन डावीकडे वळून, गुलाब पुष्प उद्यान चौकातून इच्छित स्थळी जातील.
    • पर्यायी मार्ग २ (गुलाब पुष्प उद्यान चौकातून हॉकी स्टेडियमकडे येणारी वाहने): ही वाहने गुलाब पुष्प उद्यान चौकातून डावीकडे वळून, बीएचटीसी कंपनी समोरुन क प्रभाग कार्यालय मार्गे इच्छित स्थळी जातील.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे. सदर प्रेस नोट जिल्हा माहिती व प्रसिद्धी अधिकारी, पुणे यांना पत्रकारितेतून प्रसिद्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचेल.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!