news
Home पुणे वैविद्या प्रॉडक्शन्सचा दर्जेदार आविष्कार: ‘माईक’ सिनेमातील “मन झाले विठ्ठल” गाण्याने वेधले लक्ष!

वैविद्या प्रॉडक्शन्सचा दर्जेदार आविष्कार: ‘माईक’ सिनेमातील “मन झाले विठ्ठल” गाण्याने वेधले लक्ष!

सोहम मानकर दिग्दर्शित चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; युट्यूबसह प्रमुख ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.(मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माईक’ सिनेमातील भक्ती वेद प्रस्तुत “मन झाले विठ्ठल” गाणे रसिकांच्या भेटीला: आषाढी वारीनिमित्त भक्तीमय सादरीकरण! (मॅक्स मंथन डेली न्यूज)

वैविद्या प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश खिलारे अभिनित चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; निर्माते विद्यानंद मानकर यांची माहिती.

पुणे (प्रतिनिधी): ‘इंटरनॅशनल फालम फोक’ या यशस्वी चित्रपटानंतर विद्यानंद मंदाकिनी माणिकराव मानकर सर आता “माईक” हा नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वैविद्या प्रॉडक्शन्स निर्मित आणि सोहम वैशाली विद्यानंद मानकर दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, या चित्रपटातील “मन झाले विठ्ठल” हे भक्तीगीत आज प्रदर्शित करण्यात आले, अशी माहिती निर्माते विद्यानंद मानकर सर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“मन झाले विठ्ठल” – एक भक्तीमय अनुभव

निर्माते श्री. मानकर सर यांनी गाण्याबद्दल माहिती देताना सांगितले की, भक्ती गीत गायनासाठी प्रसिद्ध असलेले श्री. ज्ञानेश्वर मेश्राम यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याचे गीत लेखन तेजस वाल्हेकर यांनी केले असून, सारंग गवळी आणि तेजस वाल्हेकर यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. विजय खुडे यांनी लेखन व संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पदार्पण पुरस्कार विजेता योगेश खिलारे हा “माईक” सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. “वैविद्या प्रॉडक्शन्स” तर्फे निर्मित या मराठी चित्रपटासाठी आध्यात्मिक विषयास अनुसरून चित्रित झालेले हे भक्ती वेद प्रस्तुत गीत आज रसिकांसाठी रिलीज करण्यात आले.

आषाढी वारीच्या मुहूर्तावर गाणे लॉन्च

दिग्दर्शक सोहम मानकर यांनी सांगितले की, १९ जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या आषाढीवारी पालखी सोहळा २०२५ च्या निमित्ताने “मन झाले विठ्ठल” हे गीत ‘भक्ती वेद यूट्यूब चॅनेल’ (www.youtube.com/@bhaktived) तसेच, आय ट्यून्स, ॲपल म्युझिक, गाणा, जीओ सावन, हंगामा, ॲमेझॉन म्युझिक, स्पॉटिफाय, वायटी म्युझिक, रेशो, पेंडॉर आणि डिझोर यांसारख्या प्रमुख ऑनलाइन ऑडिओ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे. यामुळे भक्तीरसिकांना हे गाणे सहज ऐकता येणार आहे.

“वैविद्या प्रॉडक्शन्स”ची दर्जेदार निर्मिती आणि सामाजिक बांधिलकी

“माईक” या मराठी चित्रपटासाठी “वैविद्या प्रॉडक्शन्स”ने नेहमीप्रमाणेच दर्जेदार निर्मितीवर भर दिला आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, संगीत, छायांकन, संपादन आणि इतर तांत्रिक बाबींवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कलाकारांकडून योग्य अभिनय मिळवण्यासाठी उत्कृष्ट कलाकार आणि योग्य पात्र निवडण्यात, दिग्दर्शकाने कथेला योग्य रूप देण्यात, तसेच योग्य ठिकाणी पार्श्वसंगीत आणि गाण्यांचा वापर करून चित्रपटाची गुणवत्ता वाढवण्यात आली आहे. निर्मितीनंतर संपादन, ध्वनी मिश्रण, व्हिज्युअल इफेक्ट्स अशा बाबींसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची गुणवत्ता आणखी उंचावली आहे. याबरोबरच, मराठी भाषा संवर्धन, समाज प्रबोधन आणि संस्कृती जपण्यासाठी “वैविद्या प्रॉडक्शन्स” नेहमीच कटिबद्ध असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस अभिनेता योगेश खिलारे, संकलक गौरव अडाप आदी उपस्थित होते.

आपला स्नेहांकित…. विद्यानंद मंदाकिनी माणिकराव मानकर सर निर्माता, वैविद्या प्रॉडक्शन्स, पिंपरी चिंचवड, पुणे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!