news
Home मुख्यपृष्ठ खासदार धैर्यशील मोहिते-पाटील ‘शिक्षक’ बनले: माढ्यात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, पालकांनाही मोलाचे सल्ले!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील ‘शिक्षक’ बनले: माढ्यात विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, पालकांनाही मोलाचे सल्ले!

परदेशातील संधींपासून मुलींच्या उच्च शिक्षणापर्यंत; श्रीनाथ विद्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम, रविंद्रभाऊ पाटील यांच्या प्रयत्नांना यश. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माढा मतदारसंघाला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा करिअर मार्गदर्शनाचा नवा ‘प्रकाश’!

 

 

बोरगावच्या श्रीनाथ विद्यालयात हायमास्ट लाईट पोलचे उद्घाटन; मुलींना ‘चुलीपर्यंत’ न थांबता उच्च पदांवर जाण्याचे आवाहन!

 

सोलापूर, प्रतिनिधी पंडित गवळी दि. २ जुलै २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील यांच्या खासदार निधीतून श्रीनाथ विद्यालय, बोरगाव येथे हायमास्ट लाईट पोलची उभारणी करण्यात आली. या हायमास्ट लाईट पोलचे उद्घाटन खासदार मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम केवळ एका उद्घाटनापुरता मर्यादित न राहता, खासदारांनी विद्यार्थ्यांसाठी चक्क करिअर मार्गदर्शकाची भूमिका बजावल्याने तो अधिक प्रेरणादायी ठरला.


 

खासदार साहेब झाले करिअर मार्गदर्शक!

 

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. विशेषतः, परदेशातील नोकरीच्या संधी कशा मिळवता येतात, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

त्यांनी मुलींना विशेष आवाहन केले. “मुलींनी चुलीपर्यंत करिअर न करता मोठमोठ्या नोकऱ्या मिळवाव्यात,” असे सांगत, “कोणत्याही पालकांनी मुलींना लग्नासाठी दबाव टाकला तर मला थेट फोन करा,” असे त्यांनी आवाहन केले. या त्यांच्या विधानाचे उपस्थितांकडून जोरदार स्वागत झाले. कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या भूमिकेतून खासदार साहेब हे खऱ्या अर्थाने करिअर मार्गदर्शक झाल्याचे उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना जाणवले.


रविंद्रभाऊ पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 

श्रीनाथ विद्यालय, बोरगाव येथे या हायमास्ट लाईट पोलच्या उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष मा. रविंद्रभाऊ पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता विद्यार्थ्यांना आणि गावातील नागरिकांना या दिव्यांचा लाभ मिळणार आहे.

यावेळी मुख्याध्यापक मा. रेपाळ सर, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. चांगदेव म्हसवडे, पोलिस पाटील मा. विरेंद्र पाटील, युवा नेते मा. आनंद पाटील, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव प्रा. नरेंद्र भोसले, पत्रकार शांतीलाल रेडे पाटील, मा. प्रतिक खटके पाटील, मा. शिवाजी ठोकळे आदी मान्यवर तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!