news
आकर्षक पगार अन् सुरक्षित भविष्य! आयडीबीआय बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी भरतीचा बिगुल; १९ मार्चपर्यंतच करता येणार ऑनलाइन अर्जहॉटेल उद्योगाला मोठा दिलासा! व्यावसायिक गॅस बंदीच्या पत्राने उडालेली खळबळ शमली; घरगुती गॅस साठा वाढवण्यासाठी होता मंत्रालयाचा निर्णयअभिनयाचा अन् दिग्दर्शनाचा गौरव! दुलाल रॉय, प्रणव जोशी आणि मिथिला हिरेमठ ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार; ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाने जिंकली रसिकांची मनेसक्षम कार्यकर्त्यांची नवी फळी उभारणार! शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी फुंकले प्रशिक्षणाचे रणशिंग; १४ मंडलांच्या अध्यक्षांचा एकजुटीने काम करण्याचा निर्धारकोल्हापूर ते राजस्थान; सायबर पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे! ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या; शेअर मार्केट अन् आयपीओच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा
Home पिंपरी चिंचवड कोल्हापूर ते राजस्थान; सायबर पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे! ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या; शेअर मार्केट अन् आयपीओच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा

कोल्हापूर ते राजस्थान; सायबर पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे! ७ आरोपींच्या मुसक्या आवळल्या; शेअर मार्केट अन् आयपीओच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा

गुंतवणुकीच्या नावाखाली ११ कोटी १३ लाखांचा गंडा घालणारी आंतरराज्य टोळी गजाआड; सायबर पोलिसांकडून १.८० कोटींची रक्कम बँक खात्यात गोठवण्यात यश. (@२०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून ११ कोटींची लूट! पिंपरी-चिंचवड सायबर सेलची मोठी कारवाई; ७ आरोपींना राजस्थान व महाराष्ट्रातून अटक


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ०७ मार्च २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : शेअर मार्केट आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ७ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या बँक खात्यांमधील १.८० कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात (Hold) यश मिळवले आहे.

या प्रकरणातील फिर्यादी यांना आरोपींनी वेळोवेळी विविध कारणे सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. फिर्यादींनी एकूण ११,१३,००,०००/- रुपये गुंतवले, मात्र कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३३८, ३१८(४), ३१६(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींचा शोध घेतला:

  • कोल्हापूर कनेक्शन: तपासात एक बँक खाते कोल्हापूरच्या ‘गंगासाई टेक्स्टाईल’च्या नावे असल्याचे आढळले. तेथून अभय बाबासाहेब पाटील याला अटक करण्यात आली. त्याने हे खाते शिवतेज पोटे याला कमिशनवर दिल्याचे कबूल केले.

  • पुणे व राजस्थान: शिवतेज पोटे याला वाघोली (पुणे) येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून युवराज मुदलियार (पुणे), पंकज गिरीगोस्वामी आणि प्रल्हाद गाडरी (दोघे रा. राजस्थान) यांची नावे समोर आली. त्यांनाही पोलिसांनी अटक केली.

  • मुंबई कनेक्शन: मुंबईतील दहिसर परिसरातून महेश उडचणे आणि राहुल मौर्य यांना अटक करण्यात आली. त्यांनी बँक खाते उघडून ते गुन्ह्यासाठी पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

१) अभय बाबासाहेब पाटील (वय ३४, रा. कोल्हापूर)

२) शिवतेज राजेंद्र पोटे (वय ३०, रा. वाघोली, पुणे)

३) महेश करबसप्पा उडचणे (वय २८, रा. दहिसर, मुंबई)

४) राहुल बहादूरप्रसाद मौर्य (वय २४, रा. दहिसर, मुंबई)

५) युवराज उर्फ संतोष सतीश मुदलियार (वय ३५, रा. लोहगाव, पुणे)

६) पंकज मंगू गिरीगोस्वामी (वय २४, रा. राजस्थान)

७) प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (वय २३, रा. राजस्थान)

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशांक महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रवीण स्वामी, वैभव पाटील, सागर पोमण आणि त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.

सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवून दिली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!