news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अकोला जितापूर नाकटमध्ये ‘शेड’चा प्रश्न सुटला: आमदार हरीश पिंपळे यांनी स्मशानभूमीसाठी ५ लाख निधी मंजूर केला!

जितापूर नाकटमध्ये ‘शेड’चा प्रश्न सुटला: आमदार हरीश पिंपळे यांनी स्मशानभूमीसाठी ५ लाख निधी मंजूर केला!

'मॅक्स मंथन डेली न्यूज'च्या पाठपुराव्याला यश; पावसाळ्यातील अंत्यविधीच्या त्रासातून नागरिकांना मुक्ती, माजी उपसरपंचाच्या प्रयत्नांचे कौतुक! (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माजी उपसरपंचाच्या मागणीला यश: जितापूर नाकट स्मशानभूमीसाठी आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून ५ लाख मंजूर!

‘मॅक्स मंथन डेली न्यूज’च्या बातमीची दखल; पावसात अंत्यविधीच्या त्रासानंतर नागरिकांना दिलासा!

मूर्तिजापूर, दि. ७ जुलै २०२५: मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर नाकट गावातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गावातील स्मशानभूमीत शेड नसल्याने भर पावसात अंत्यविधी पार पाडताना होणाऱ्या त्रासाची पत्रकार विलास सावळे ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने काही आठवड्यांपूर्वी दखल घेतली होती. या बातमीच्या प्रसारानंतर, आता माजी उपसरपंचाच्या मागणीला यश मिळाले असून, आमदार हरीश पिंपळे यांनी स्थानिक विकास निधीतून ५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

पावसातील अंत्यविधीचा हृदयद्रावक प्रसंग आणि नागरिकांची मागणी

मागील काही आठवड्यांपूर्वी जितापूर नाकट गावात स्मशानभूमी नसल्याने एक हृदयद्रावक घटना घडली होती. गावातील ८५ वर्षीय दशरथ बलराम तायडे यांचे निधन भर पावसात झाले. स्मशानभूमी शेड नसल्यामुळे, त्यांच्या अंत्यविधीसाठी जितापूर नाकटपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भटोरी रोड येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांना नेऊन अंत्यविधी पार पाडावा लागला होता. ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’चे पत्रकार विलास सावळे यांनी ही बातमी प्रसारित केल्यानंतर, गावातील नागरिकांनी याची गंभीर दखल घेतली. गावकऱ्यांनी मानले मॅक्स मंथन डेली न्यूज चे पत्रकार विलास सावळे यांचे आभार !

आमदार हरीश पिंपळे यांची तत्परता

या घटनेनंतर काही दिवसांनी गावातील नागरिकांनी मूर्तिजापूर विधानसभा ३२ चे आमदार हरीश पिंपळे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. नागरिकांनी आपली समस्या आमदार पिंपळे यांच्यासमोर मांडली. आमदार हरीश पिंपळे यांनी नागरिकांची समस्या सहानुभूतीपूर्वक जाणून घेऊन तात्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी तातडीने पाच लाख रुपये निधी मंजूर करून स्मशानभूमीसाठी शेड (टेन सेट) उपलब्ध करून दिला.

आमदार पिंपळे यांच्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. या निधीमुळे जितापूर नाकट येथील स्मशानभूमीत आता आवश्यक शेड उभारले जाईल, ज्यामुळे भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!