लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आदर्शरित्या नियोजन करणार – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर!
पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यक्रमाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न; नागरिकांच्या सूचनांचाही विचार होणार!
पिंपरी, दि. १५ जुलै २०२५: “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करताना विविध संस्था, संघटना आणि नागरिक यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल. हा कार्यक्रम उत्साहात व आदर्शरित्या साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
या बैठकीदरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव २०२५-२६ चे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब रसाळ यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व: ५ दिवसीय सोहळा!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच दिवसीय ‘विचार प्रबोधन पर्वा’चे आयोजन निगडी येथील भक्ती शक्ती चौकात करण्यात येते. यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

आढावा बैठकीला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारी, पोलीस, मेट्रो प्रशासन, पी.एम.पी.एम.एल. (PMPML) अधिकारी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असे विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर बैठकीस माजी नगरसदस्य भगवान शिंदे, काळूराम पवार, माजी नगरसदस्या कमल घोलप, उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता विजय वायकर, डी.पी.पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, मेट्रो व्यवस्थापनाचे धनंजय कृष्णन, युवराज गावंडे, उप अभियंता ए.ए.कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, नितीन घोलप, संजय ससाणे, युवराज दाखले, अरुण जोगदंड, सुनिल भिसे, नाना कसबे, डी.पी.खंडाळे, सतिश भवाळ, सुनिल भिसे, आशाताई शहाणे, लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबू पाटोळे, बारा बलुतेदार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव, युवराज भास्कर, चंद्रकांत लोंढे, संजय धुतडमल, उत्तम कांबळे, युवराज तिकटे, बाबासाहेब पाटोळे, गणेश अवघडे, शिवाजी साळवे, श्रीमंत गायकवाड, शिवाजी चव्हाण, साहेबराव थोरात, कैलास पाटोळे, शिवाजी खडसे, विठ्ठल वाघमारे, तात्यासाहेब पाटोळे, उषा आल्हाट, धिरज सकट, सचिन कसबे, नाना सगर, सनी सकट, काशिनाथ आल्हाट, लक्ष्मण लोखंडे, बाळासाहेब खंदारे, मारूती सोनटक्के, ऋषिकेश गणगे, नानासाहेब नरमिंगे, अविनाश कांबीकर, राजू जाधव, शाहीर रामलिंग जाधव, राम चौधरी, नाना कांबळे, अर्जुन नेटके, मंदार बागव, विकास गायकांबळे, मयुर गायकवाड, सुरेश मिसाळ, शिवाजीराव साबळे, रामदास कांबळे, अण्णासाहेब कसबे, भानुदास साळवे, महादू आडागळे, विष्णू कसबे, शंकर खवळे, आनंद कांबळे, वैभव वायकर, राजू आवळे, सुनील खुडे, सोमनाथ कांबळे, गणेश अवघडे, राम साठे, उषा आल्हाट, के.के. आल्हाट, राकेश भिलारे, स्वप्नील वाघमारे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे उपलेखापाल अनिल कु-हाडे, अभिजीत डोळस आदी उपस्थित होते.

बैठकीत आलेल्या महत्त्वाच्या सूचना:
आजच्या बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत विविध सूचना प्राप्त झाल्या. कार्यक्रमाचे नियोजन करताना या सूचनांचा महापालिका स्तरावर विचार करण्यात येईल, असे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले. त्यांनी सर्वांच्या सहकार्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.
बैठकीमध्ये आलेल्या प्रमुख सूचनांमध्ये हे मुद्दे समाविष्ट होते:
- विचार प्रबोधन पर्वानिमित्त उत्तम वक्त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करावे.
- उत्कृष्ट व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करावे.
- शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करावे.
- शहराच्या स्वच्छतेविषयी प्रभावी भूमिका बजावणाऱ्या स्वच्छतादूत म्हणजेच अवकारीका सिनेमा कलाकारांचा सन्मान करण्यात यावा.
- रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे.
- वृक्षारोपण मोहीम, आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.
- परिसंवाद आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करावे.
- कार्यक्रमास विविध मान्यवरांना निमंत्रित करावे.
या बैठकीचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येते, याबद्दल विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख करून देण्यासाठी असे महोत्सव उपयोगी ठरतात, असे सांगितले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
