news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये कलाकारांच्या ‘रंगमंचा’चा सन्मान!

पिंपरी-चिंचवडमध्ये कलाकारांच्या ‘रंगमंचा’चा सन्मान!

नाट्य परिषदेच्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांचा गौरव. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा वर्धापनदिन: कलाकारांचा गौरव सोहळा!

 

 

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘बालगंधर्व’ ते ‘स्मिता पाटील’ पुरस्कारांनी सन्मान

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे  २० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जीवनात मोलाची भर घालणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेला नुकतीच २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून येत्या २३ ऑगस्ट रोजी नाट्य परिषद एका भव्य वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संध्याकाळी ५ वाजता पार पडेल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या वर्षीचा सोहळा विशेष लक्षवेधी ठरणार आहे, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

या मान्यवरांचा होणार गौरव:

यंदा विविध क्षेत्रांतील योगदानासाठी अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रख्यात संगीतकार ज्ञानेश पेंढारकर यांना ‘कै. बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर, आजच्या पिढीतील लोकप्रिय कवी, लेखक आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना ‘कै. आचार्य अत्रे पुरस्कार’ प्रदान केला जाईल. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांना ‘कै. अरुण सरनाईक पुरस्कार’ दिला जाईल, तर कवयित्री आणि गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी यांना ‘कै. स्मिता पाटील पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, ‘पत्रास कारण की…’ यांसारख्या लोकप्रिय लेखनामुळे घराघरात पोहोचलेले लेखक अरविंद जगताप यांना ‘कै. जयवंत दळवी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

यासोबतच, पिंपरी-चिंचवडचे भूषण पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुरेश साखवळकर यांचाही विशेष सत्कार होणार आहे. स्थानिक कलाकार आणि राज्य नाट्य स्पर्धा विजेत्यांनाही या सोहळ्यात सन्मानित केले जाईल, असे भोईर यांनी सांगितले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!