news
Home पिंपरी चिंचवड परंपरा आणि उत्साहाचा मेळ: ‘मंगळागौर’ने वाकडमध्ये आणली चैतन्याची लाट!

परंपरा आणि उत्साहाचा मेळ: ‘मंगळागौर’ने वाकडमध्ये आणली चैतन्याची लाट!

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिलांनी पारंपरिक खेळांचा घेतला मनमुराद आनंद; स्वाती कलाटे यांची विशेष उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

वाकडमध्ये जेष्ठ नागरिक महिलांचा ‘मंगळागौर’ उत्सव!

 

 

फुगड्या आणि पारंपरिक खेळांनी खुलला आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचा उत्साह

 

 

वाकड प्रतिनिधी शाम सोनवणे :- २० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाकड येथील पोस्टल कॉलनीमध्ये असलेल्या आनंद ज्येष्ठ नागरिक संघाने यंदाचा ‘मंगळागौर’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, ज्येष्ठ महिलांनी पारंपरिक पद्धतीने एकत्र येऊन सणाचा आनंद लुटला. या सोहळ्यामुळे येथील वातावरण चैतन्यमय बनले होते.

कार्यक्रमाची सुरुवात माजी नगरसेविका सौ. स्वाती कलाटे आणि महिला मंडळ प्रमुख सौ. अलका कळमकर यांच्या हस्ते करण्यात आलेल्या गौरीपूजनाने झाली. त्यानंतर सौ. चित्रा बरहाटे यांनी मंगळागौरीच्या माहितीवर मार्गदर्शन केले, ज्यामुळे या सणामागील महत्त्व अधिक स्पष्ट झाले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते विविध पारंपरिक खेळ! यात फुगडी, झिम्मा, टिपऱ्या, पिंगा आणि इतर जुन्या खेळांचा समावेश होता. सर्व महिलांनी सौ. स्वाती कलाटे यांच्या सोबत या खेळांमध्ये सामूहिकरीत्या सहभाग घेतला आणि मनसोक्त आनंद लुटला. खेळांच्या उत्साहानंतर स्वातीताईंचा सत्कार करण्यात आला आणि मंगळागौरीची आरती झाली. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन अल्पोपहार घेतला.

या सुंदर कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समितीच्या सर्व सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच, अध्यक्ष भागवत कोल्हे, सचिव सुरेश बोरकर, खजिनदार माधव बरहाटे आणि प्रसिद्धी प्रमुख अशोक बोंडे यांचे मार्गदर्शन या सोहळ्यासाठी मोलाचे ठरले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!