news
पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचा विकासकामांचा धडाका; निगडी अतिरिक्त मेट्रो स्थानक निधीसह पुनावळे फायर स्टेशनला मंजुरी!पिंपरी-चिंचवड मनपा सुरक्षा रक्षकांना आता थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ पदावर मिळणार पदोन्नती; विधी समितीचा ऐतिहासिक ठराव मंजूर!पिंपळे गुरवमधील ‘कै. शेवंताबाई जगताप शाळे’चे काम ५ वर्षांपासून प्रलंबित; राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड प्रशासनाविरोधात आक्रमक!मालमत्ता करावर ५ ते ५०% सवलत मिळवण्याची अंतिम संधी; ३० जूननंतर पिंपरी-चिंचवड मनपा ॲक्शन मोडमध्ये, मालमत्ता जप्तीचा दिला इशारा!पिंपरी-चिंचवड मनपाकडून २८ जून रोजी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ’ मोहिमेचे आयोजन; ० ते ५ वर्षांखालील बालकांसाठी १,१२३ केंद्रे सज्ज!
Home पिंपरी चिंचवड वाहनचोर टोळी जेरबंद: काळेवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

वाहनचोर टोळी जेरबंद: काळेवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

एकापाठोपाठ १० गुन्हे उघडकीस; पिंपरी-चिंचवडसह इतर परिसरातील चोरीच्या दुचाकी जप्त, दोन आरोपींना अटक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

काळेवाडी पोलिसांची मोठी कारवाई: ८.४० लाखांच्या २० दुचाकी जप्त, वाहनचोर टोळीला अटक

 

 

विविध पोलीस ठाण्यांमधील १० गुन्हे उघड, आरोपी रायगडचे रहिवासी

 

२१ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – काळेवाडी पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ८.४० लाख रुपये किमतीच्या २० दुचाकी जप्त केल्या असून, त्यापैकी १० दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरातील पाचपीर चौकात सापळा रचून पोलिसांनी शुभम चंद्रकांत शिंदे (वय २६, रा. नढेनगर, काळेवाडी, मूळ रा. रायगड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याचा साथीदार सोमनाथ शांताराम कासरुंग (वय ३२, रा. मुळशी, मूळ रा. रायगड) यालाही अटक केली.

या दोन्ही आरोपींकडून हिरो होंडा, स्प्लेंडर, युनिकॉर्न, पल्सर आणि ॲक्टीव्हा अशा विविध कंपन्यांच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी १० दुचाकी चोरीचे गुन्हे काळेवाडी, हिंजवडी, वाकड, चिंचवड, चिखली आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या कारवाईमुळे अनेक दुचाकी मालकांना त्यांचे वाहन परत मिळण्याची आशा आहे.

पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यवंशी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!