news
Home पुणे ‘या’ खड्ड्यांमुळे रोज अपघात! वाघोलीकरांनी घेतला रस्त्यावरचा ताबा

‘या’ खड्ड्यांमुळे रोज अपघात! वाघोलीकरांनी घेतला रस्त्यावरचा ताबा

बकोरी रोडच्या दुर्दशेला कंटाळून नागरिकांचे ठिय्या आंदोलन; दोषी बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

वाघोली-बकोरी रोडच्या दुरवस्थेमुळे नागरिक आक्रमक; रस्त्यावर ठिय्या आंदोलन

 

 

१३ वर्षांपासून खड्डेमय रस्त्यामुळे अपघात वाढले; नागरिकांचा तात्काळ दुरुस्तीचा आणि बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

 

पुणे/वाघोली – वाघोली-बकोरी रोडची गेल्या १३ वर्षांपासून दुरवस्था झाली असून, खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या वाढत्या अपघातांना कंटाळून संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. रविवारी (दि. २४) येथील नागरिकांनी एकत्र येत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.

नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करत म्हटले की, या रस्त्यामुळे दररोज अपघात होत असून अनेकांना गंभीर जखमा होत आहेत. तसेच, वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नागरिकांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. या रस्त्याच्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.


पोलिसांकडून तात्पुरता तोडगा आणि कारवाईचे आश्वासन

 

आंदोलनाची माहिती मिळताच वाघोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि वाहतूक सुरळीत ठेवली. नागरिकांच्या मागणीनुसार, पोलिसांनी त्यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी संबंधित बिल्डरचीही चौकशी केली असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

हा प्रश्न तातडीने न सुटल्यास येत्या काही दिवसांत आमरण उपोषण करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेडल्याने या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!