news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड ‘बाप्पा’च्या जयघोषात महापालिका ‘एक’ झाली! कर्मचारी महासंघाच्या गणेशोत्सवाला आयुक्तांची उपस्थिती

‘बाप्पा’च्या जयघोषात महापालिका ‘एक’ झाली! कर्मचारी महासंघाच्या गणेशोत्सवाला आयुक्तांची उपस्थिती

आयुक्त शेखर सिंह यांनी केली गणरायाची आरती; सांस्कृतिक कार्यक्रमांसह पर्यावरणपूरक विसर्जनाचे आयोजन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कर्मचारी महासंघाच्या वतीने महापालिकेत गणेशोत्सव उत्साहात साजरा

 

 

आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 

२८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा होत आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सुरू झालेल्या या सोहळ्यात आज सायंकाळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल

 

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, महापालिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे, खजिनदार नितीन सनगीर यांच्यासह सनी कदम, विशाल भुजबळ, अभिषेक फुगे, विश्वनाथ लांडगे, दत्ता ढगे, ईश्वर आठवल, गणेश जाधव, विजया कांबळे, माया वाकडे, शितल पवार, योगिता पाटील यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्मचारी महासंघाने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. उद्या, २९ ऑगस्ट रोजी श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच, विसर्जनाच्या वेळी पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहितीही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!