news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ‘स्मार्ट सिटी’च्या उद्योगांचे प्रश्न ‘जैसे थे’! सुविधा कक्षाकडे दुर्लक्ष?

‘स्मार्ट सिटी’च्या उद्योगांचे प्रश्न ‘जैसे थे’! सुविधा कक्षाकडे दुर्लक्ष?

भोसरी औद्योगिक वसाहतीतील वीज, रस्ते, सांडपाणी आणि सुरक्षेच्या समस्या गंभीर; राष्ट्रवादी काँग्रेसने आयुक्तांकडे मागितली तातडीची बैठक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उद्योजकांच्या समस्यांवर तातडीने बैठक बोलावण्याची मागणी

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिका आयुक्तांना निवेदन; भोसरी औद्योगिक वसाहतीतील समस्यांचा पाढा

 

२८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेने उद्योजकांसाठी सुरू केलेल्या ‘उद्योग सुविधा कक्षा’कडे स्थानिक उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.


 

वीज, रस्ते आणि सुरक्षेची समस्या

 

निवेदनामध्ये भोसरी औद्योगिक महामंडळ भागातील अनेक गंभीर समस्यांवर लक्ष वेसण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने विजेची समस्या, अकार्यक्षम सांडपाणी व्यवस्थापन, कचरा वाहनांची अनियमितता आणि रस्त्यांवर खडी असल्याने होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या प्रश्नांचा समावेश आहे.

याशिवाय, औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर पथदिवे असूनही झाडांच्या फांद्या वाढल्याने पुरेसा प्रकाश पडत नाही, ज्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत आणि महिला कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.


 

समस्या सोडवण्यासाठी तातडीची गरज

 

निवेदनात नमूद केलेल्या काही प्रमुख समस्या:

  • ग्रीन वेस्ट: झाडांच्या फांद्या आणि गवत उचलण्यासाठी महापालिकेची वाहने येत नाहीत.

    काढलेले ग्रीन वेस्ट उचलण्यासाठी महानगरपालिकेले वाहन येतं नाही.

    कचरा कित्येक दिवस कंपनी बाहेर पडून असतो.

  • ई-कचरा: कित्येक दिवस कंपन्यांच्या बाहेर पडून असतो.
  • अंतर्गत रस्ते: अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही किंवा काही रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात पथदिवे नाहीत, छन् ETP सांडपाणी प्रकिया प्रकल्प करण्याबाबतच नाही.
  • वाहतूक कोंडी: एमआयडीसी चौक आणि गवळी माथा येथे सतत वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे वाहतूक नियंत्रण पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
  • सार्वजनिक सुविधा: २२ ब्लॉकमध्ये महापालिकेचे रुग्णालय नाही आणि पीएमपीएमएल बसथांबे देखील नाहीत.
  • अंधारात कामगारांना लुटण्याचे प्रकार , महिला कामगारांची सुरक्षा धोक्यात, औदयोगिक गाळयांचे वाटप होत नाही.

या गंभीर बाबींवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी लक्ष घालून तातडीने उद्योजकांची बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!