news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; ‘साई स्पोर्ट्स अकॅडमी’ बनली सुवर्ण विजेत्यांची खाण!

पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; ‘साई स्पोर्ट्स अकॅडमी’ बनली सुवर्ण विजेत्यांची खाण!

मधुरा आणि समृद्धीने पटकावली ४ सुवर्ण; प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंची राज्यस्तरावर निवड. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुना डिस्ट्रिक्ट ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये साई स्पोर्ट्स अकॅडमीचे वर्चस्व!

 

 

मधुरा खांबे आणि समृद्धी भोईर यांना प्रत्येकी दोन सुवर्णपदके; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – पुना डिस्ट्रिक्ट ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत साई स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. अकॅडमीच्या मधुरा खांबे आणि समृद्धी भोईर या ऍथलेटिक्सनी आपापल्या इव्हेंटमध्ये प्रत्येकी दोन सुवर्णपदके पटकावून अकॅडमीचे नाव उज्वल केले. ही स्पर्धा २५ आणि २६ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडली.


 

घवघवीत यशाची नोंद

 

या स्पर्धेत मधुरा खांबेने लॉन्ग जंप आणि ट्रिपल जंप मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर समृद्धी भोईरने हॅप्टथलोन आणि १०० मीटर हर्डल्स मध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे दोघांचीही निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे, ज्या २ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान बालेवाडी येथेच होणार आहेत.

याशिवाय, अकॅडमीच्या इतर खेळाडूंनीही पदक पटकावले. हर्षल कुमार याने ११० मीटर हर्डल्स आणि ४०० मीटर हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक मिळवला, तर राखी फरिदाले ने थाळीफेक प्रकारात आणि नंदिनी कासकरने भालाफेक प्रकारात कांस्यपदक मिळवले.

हे सर्व खेळाडू अनेक वर्षांपासून चंद्रशेखर कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील संत तुकाराम क्रीडा संकुलात नियमित सराव करत आहेत. कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झाले असून, त्यांच्या प्रशिक्षणामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात खेळाचे वातावरण अधिक समृद्ध होत आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!