सांगवी हास्य व योगा क्लबचा २० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न! (मॅक्स मंथन डेली न्यूज, सांगवी)
ज्येष्ठ प्रवचनकार वाघ महाराज आणि सामाजिक कार्यकर्ते भागवत यांची प्रमुख उपस्थिती.
सांगवी: सांगवी येथे गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या चैतन्य हास्य व योगा क्लबचा २० वा वर्धापन दिन ३० मे रोजी सावता माळी उद्यानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमासाठी ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. श्री बब्रुवाहन वाघ महाराज आणि सांगवी विकास मंचचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री महेश भागवत यांनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर हास्य क्लबचे संस्थापक सदस्य श्री प्रफुल्ल अनंतवार आणि श्री नारायणराव कदम या ज्येष्ठ सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याचे औचित्य साधून हास्य क्लबचे अध्यक्ष श्री बबनराव सोनवणे हे नाबार्ड बँकेतील त्यांच्या दीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री नारायणराव भागवत यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात दैनंदिन जीवनात व्यायाम, योग आणि हास्याचे महत्त्व उदाहरणांसह विशद केले.

मुख्य अतिथी ह.भ.प. श्री वाघ महाराज यांनी हास्य व योगा क्लबच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी चालवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी वेळ काढून लोकांमध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.
श्री बबनराव सोनवणे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब जाधव आणि श्री सोनवणे यांनी संयुक्तपणे केले. या आनंददायी सोहळ्याला हास्य व योगा प्रेमी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.



यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, “सेवानिवृत्त झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने महापालिकेची सेवा केली आहे. आता त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्यात आरोग्याची काळजी घ्यावी, आनंदी राहावे आणि आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यावा. तसेच, नोकरीच्या काळात जे छंद जोपासता आले नाहीत, ते आता जरूर पूर्ण करावेत.” त्यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
