news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home सोलापूर अहिल्यादेवी: लोककल्याणकारी आदर्श!

अहिल्यादेवी: लोककल्याणकारी आदर्श!

सोलापुरात प्रणिती शिंदेंकडून अभिवादन; कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. प्रतिनिधी:- पंडित गवळी

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन!

प्रतिनिधी:- पंडित गवळी (मॅक्स मंथन डेली न्यूज, सोलापूर)

सोलापूर, दि. ३१ मे २०२५: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा, सिटी पार्क समोर त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून आदराने अभिवादन केले. यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि मध्यवर्ती चे अध्यक्ष सिद्ध निशामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत रस्ते, विहिरी, तलाव, नदीघाट आणि धर्मशाळांसारख्या अनेक लोकोपयोगी सुविधा निर्माण केल्या. त्यांनी एक कुशल प्रशासक म्हणून आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज सोलापुरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी नगरसेवक आणि प्रवक्ते अशोक निंबर्गी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, युवा नेते शैलेश पिसे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, अंबादास गुत्तीकोंडा, मिडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, अनिल मस्के, हारून शेख, परशुराम सतारेवाले, सागर उबाळे, लखन गायकवाड, रफिक चकोले, नागेश म्हेत्रे, गौतम मसलखांब, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, भीमराव शिंदे, जितू वाडेकर, गिरिधर थोरात, राजेश झंपले, विवेक इंगळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, शिवाजी साळुंखे, नागनाथ शावणे, मोहसीन फुलारी, दिगंबर मेटकरी, अप्पा सलगर, रुकैयाबानु, सलीमा शेख, बिराजदार, मार्ता रावडे, दत्तात्रय नामकर, हाजी मेहमूद शेख, गोपी खांडेकर, सिद्धू बिराजदार, जयजित देवकते, दत्तात्रय गजभार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि लोकोपयोगी कार्याचे महत्त्व विशद केले. त्यांच्या कार्यामुळे आजही समाजाला प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिनिधी: पंडित गवळी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!