Home पिंपरी चिंचवड महापालिकेतील ८८ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ!

महापालिकेतील ८८ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ!

अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा; विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश.

by maxmanthannews@gmail.com

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ८८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून निवृत्तांना शुभेच्छा!

पिंपरी, दि. ३१ मे २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एकूण ८८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माहे मे २०२५ अखेरीस नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती घेऊन शासकीय सेवेतून निरोप घेतला. यामध्ये एका सह आयुक्तांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत विविध पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते त्यांना मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, “सेवानिवृत्त झालेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने महापालिकेची सेवा केली आहे. आता त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्यात आरोग्याची काळजी घ्यावी, आनंदी राहावे आणि आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यावा. तसेच, नोकरीच्या काळात जे छंद जोपासता आले नाहीत, ते आता जरूर पूर्ण करावेत.” त्यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला शहर अभियंता मकरंद निकम, उप आयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी चारूशिला जोशी, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे यांच्यासह महापालिकेतील अनेक आजी-माजी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

निवृत्त झालेल्यांमध्ये यांचा समावेश:

  • सह आयुक्त: १-चंद्रकांत इंदलकर
  • मुख्याध्यापक: ८-राजाराम भागवत, ज्योती चिपाडे, शाहिदा सय्यद, सुरेखा भालचीम, सारिका कानडे, सुनिता घुले, अरुणा महानवर,
  • सह शहर अभियंता: २-संजय खाबडे, विजयकुमार काळे
  • सहाय्यक आयुक्त: १-श्रीकांत कोळप,
  • सिस्टर इंचार्ज: ४-सुवर्णा ताठे, वंदना बांगर, ललिता पोखरकर, शारदा पुंडे
  • कार्यकारी अभियंता: १-दिलीप धुमाळ
  • प्रशासन अधिकारी: १- संजीव भांगले,
  • कार्यालय अधीक्षक: ३-वंदना ठाकरे, रवींद्र भाट
  • वाहन चालक: ५-देविदास अस्वरे, शंकर खुडे, बालाजी अय्यंगार, सुनील जगताप, प्रदीप हिले,
  • मजूर: १६- जवाहरलाल सुंदेचा, रखवालदार रवींद्र वाळूंजकर, देवजी भांगे, कैलास येलवंडे, पोपट गावडे, मुकादम आनंदा भगत, सुनिल गायकवाड, आशा जाधव, अविनाश वाघेरे, नाईक सुभाष भुजबळ, मजूर गुलाब गुजर, अशोक लांडे, बाबासाहेब तिकोणे, गोपाल काळभोर, अनिल इंगळे, तानाजी चौधरी, शिवशंकर शट्टर, पंडित देवकर, शंकर शिर्के, काळूराम कुदळे, रमेश मोरे, प्रीतम धनानी, बाळू फुगे, प्रभाकर पाडाळे, लक्ष्मण शिंदे, विश्वनाथ लांडगे
  • सफाई कामगार: १०-मंगल पोळपघट, लता धेंडे, अब्दुल रज्जाक कोरबू, नंदा खुडे, पांडुरंग मेमाणे, तुळजाबाई तायडे, बाळू दिंबर, शशिकला जंजाळे, गटरकुली दिलीप पाचारणे

याव्यतिरिक्त, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ६ कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!