Home सोलापूर मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा!

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा!

खासदार प्रणिती शिंदेंनी दिले म्हैसाळ योजनेचे आश्वासन. - पंडित गवळी (मॅक्स मंथन डेली न्यूज, सोलापूर)

by maxmanthannews@gmail.com

मंगळवेढ्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रण! म्हैसाळ योजनेतून पाणी आणण्याचे खासदार प्रणिती शिंदेंचे आश्वासन! (मॅक्स मंथन डेली न्यूज, सोलापूर)    प्रतिनिधी: पंडित गवळी

सलगर बुद्रुक आणि लवंगी गावांना खासदार प्रणिती शिंदेंची भेट; ग्रामस्थांशी साधला संवाद.

सोलापूर, दि. ३० मे २०२५: “मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. या गावांमध्ये खाजगी संस्थेमार्फत पाणीपुरवठ्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तसेच, म्हैसाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी सलगर बुद्रुक आणि लवंगी परिसरात आणण्यासाठीही मी विशेष प्रयत्न करणार आहे,” असे ठोस आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक आणि लवंगी या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या निवेदनांचा स्वीकार केला. तसेच, ग्रामस्थांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार शिंदे म्हणाल्या, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश मी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे.”

या दौऱ्यात मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रविकिरण कोळेकर, सलगर बुद्रुकचे सरपंच कदम साहेब, डॉक्टर अंकुश कांबळे, बसवराज धायगोंडे, चंद्रकांत पाटील, लवंगी गावच्या सरपंच ओवाळे ताई, राहुल कांबळे, पिंटू खडतरे, तानाजी पवार, भारत निकम, शिवाजी चव्हाण आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांना आपल्या समस्या सांगितल्या आणि पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली. खासदार शिंदे यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करतील.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!