news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड मोकाट जनावरांच्या प्रश्नावर पिंपरी-चिंचवडला दिलासा!

मोकाट जनावरांच्या प्रश्नावर पिंपरी-चिंचवडला दिलासा!

चिखलीमध्ये भव्य गोशाळा; भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीमुळे नागरिकांना मिळणार सुरक्षिततेची हमी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

पिंपरी चिंचवडमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार; गोशाळा उभारणीचे काम लवकरच सुरू

 


 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप गायकवाड यांनी उपायुक्तांना दिले निवेदन; भटक्या कुत्र्यांसाठी नसबंदीचा निर्णय

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, १० सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड शहरात मोकाट जनावरे आणि भटके श्वान यांचा वाढता प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची भेट घेऊन या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान उपायुक्त खोत यांनी महापालिकेच्या नियोजनाची माहिती दिली.


 

चिखली येथे गोशाळा उभारणी

 

मोकाट जनावरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने चिखली येथे पाच एकर जागेत गोशाळा उभारण्याचे निश्चित केले आहे. या जागेच्या सीमाभिंतीचे बांधकाम सुरू असून, गोशाळेपर्यंत पोहोचण्यासाठीच्या रस्त्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास उपायुक्त खोत यांनी व्यक्त केला.


 

भटक्या कुत्र्यांसाठी नसबंदी

 

याचवेळी भटक्या श्वान यांच्या समस्येवरही उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना त्याच ठिकाणी सोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या आयुक्त स्तरावर श्वानांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांची सुरक्षितता आणि सोयीसाठी हे दोन्ही प्रश्न तातडीने मार्गी लावले जावेत, अशी आग्रही मागणी प्रदीप गायकवाड यांनी या वेळी केली. त्यामुळे आता प्रशासनाकडून या प्रश्नांवर जलदगतीने कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!