news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home अकोला अकोला पोलिसांची वाखाणण्याजोगी कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपीला चार राज्यांमध्ये पाठलाग करून अटक.

अकोला पोलिसांची वाखाणण्याजोगी कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारातील आरोपीला चार राज्यांमध्ये पाठलाग करून अटक.

गुन्हा घडताच सूत्रे हलली; तपास पथकाने तब्बल ५००० किमीचा प्रवास करून गुन्हेगाराला मध्य प्रदेशातून पकडले. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अकोला पोक्सो प्रकरण: ५००० किमी पाठलाग करून नराधमास अटक

 


 

गणेश विसर्जन सुरू असताना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलीस पथकाने चार राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली

 

अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, १२ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोल्याच्या डाबकी रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली होती, जिथे गणेश विसर्जनासाठी कुटुंबीय घराबाहेर गेले असताना एका अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा तब्बल ५००० किलोमीटर पाठलाग करत त्याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे.


 

काय आहे नेमके प्रकरण?

 

दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, गणेश विसर्जनासाठी सर्व कुटुंबीय बाहेर गेले असता अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. याच संधीचा फायदा घेत तौहिद खान समीर खान बैद (वय २८, रा. अकोला) याने घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्याने मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्यामुळे अकोल्यातील वातावरण तणावपूर्ण झाले होते आणि विविध संघटनांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत मोर्चा काढला होता.


 

पोलिसांची थरारक मोहीम आणि अथक पाठलाग

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार केली. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. त्याने सूरतमध्ये आपला मोबाईल सोडून पोलिसांना आव्हान दिले.

या पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याचा पाठलाग सुरू ठेवला. आरोपीने महाराष्ट्र (भुसावळ) पासून गुजरात (सूरत, अहमदाबाद), उत्तर प्रदेश (आग्रा, झांशी, ललितपूर), आणि मध्य प्रदेश (भोपाळ, गुना, उज्जैन, देवास) अशा अनेक राज्यांमध्ये प्रवास केला. जवळपास ५००० किलोमीटरचा प्रवास करूनही आरोपी कुठेही थांबत नव्हता.

अखेर, तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले व अंमलदार शेख हसन, एजाज अहेमद, मोहम्मद आमीर यांच्या पथकाने वेशांतर करून इंदूर (मध्य प्रदेश) येथे सापळा रचला आणि आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली.


 

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास

 

तौहिद खान बैद याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात चोरी, मारामारी आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व  श्री बी. चंद्रकांत रेड्डी सा, जि अकोला,यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके सा. स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स्था.गु.शा. येथील स.पो.नि. विजय चव्हाण, गोपाल ढोले, पो.उप.नि. गोपाल जाथय, माजीद पठाण, विष्णु बोडखे व  पो. अमंलदार दशरथ बोरकर, शेख हसन, फिरोज खान, अब्दुल माजीद, वसिमोद्दीन, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, भास्कर थोत्रे, गोकुळ चव्हाण, उमेश पराये, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, एजाज अहेमद, श्रीकांत पातोंड, राहुल गायकवाड, मोहम्मद आमीर, आकाश मानकर, राज चंदेल, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, स्वप्नील खेडकर, अन्सार अहेमद, स्वप्नील चौधरी अशोक सोनवणे, सतिश पवार,, प्रशांत कमलाकर, तसेच सायबर शाखेचे  एकूण १० अधिकारी आणि ४० अंमलदारांनी दिवस-रात्र मेहनत करून या आरोपीला पकडण्यात यश मिळवले. या कामगिरीमुळे अकोला पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!