news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या आरोग्यासाठी मोठी चळवळ

पिंपरी-चिंचवडच्या आरोग्यासाठी मोठी चळवळ

शहरातील रुग्णालयांत एकाच वेळी शुभारंभ; आरोग्याची हमी देणाऱ्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन.(© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा दणदणीत शुभारंभ

 

 

महिला व बालकांसाठी आरोग्य सेवांची कवाडं खुली; पहिल्याच दिवशी २१०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

 

पिंपरी= चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले  १७ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या राष्ट्रीय अभियानाचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. महिला व बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत बनसोडे यांनी महापालिकेच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. या अभियानाला पहिल्याच दिवशी २१०० हून अधिक महिला व बालकांनी प्रतिसाद दिला.


 

विविध रुग्णालयांमध्ये एकाच वेळी शुभारंभ

 

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभर हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर येथे झाला, ज्याचे थेट प्रक्षेपण शहरातील रुग्णालयांत दाखवण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय (आकुर्डी), तालेरा रुग्णालय, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वाय.सी.एम.) आणि नवीन भोसरी रुग्णालय येथे एकाच वेळी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

आकुर्डी रुग्णालयातील कार्यक्रमात अण्णा बनसोडे यांच्यासह माजी खासदार अमर साबळे,  महापालिका आयुक्त शेखर सिंह, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसदस्य निलेश पांढरकर,सुनिल कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तालेरा रुग्णालयात आमदार उमा खापरे आणि शंकर जगताप यांच्या हस्ते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, माजी नगरसदस्य नामदेव ढाके, तुषार हिंगे, राजेंद्र गावडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार व सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अंजली ढोणे, डॉ. संगीता तिरुमणी  तर वाय.सी.एम. रुग्णालयात आमदार अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगर सदस्य सुजाता पालांडे,वैद्यकीय अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे उपस्थित होते. तसेच भोसरी रुग्णालयात टेल्को युनियन अध्यक्ष सचिन लांडगे  यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले.

यावेळी शहरातील विविध रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. गोविंद नरके, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. संजय सोनेकर, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. शैलजा भावसार तसेच विविध विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

 


 

अभियानातील प्रमुख सेवा

 

या अभियानांतर्गत शहरातील ८ रुग्णालये आणि २७ दवाखान्यांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. यात खालील सेवांचा लाभ घेता येणार आहे:

  • तपासणी: उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग आणि ॲनिमियाची तपासणी.
  • गर्भवती महिलांसाठी: तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषण समुपदेशन आणि लसीकरण.
  • किशोरींसाठी: मासिक पाळी व पोषणाविषयी मार्गदर्शन सत्रे आणि समुपदेशन.
  • डिजिटल योजना: आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान वय वंदना कार्डांचे वितरण.
  • इतर सुविधा: आवश्यक रुग्णांना तज्ज्ञांकडून पुढील तपासण्या (रक्त, लघवी, सोनोग्राफी, ई.) तसेच क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी ‘निक्षय मित्र’ स्वयंसेवकांची नोंदणी केली जाणार आहे.

या अभियानाबद्दल बोलताना महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “हा उपक्रम महिला व बालकांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.” आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनीही नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!