news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home अकोला कायदा-सुव्यवस्थेसोबत खेळाचीही आवड

कायदा-सुव्यवस्थेसोबत खेळाचीही आवड

अकोला जिल्हा पोलिसांचा ‘फिटनेस’ आणि ‘बांधिलकी’चा आदर्श. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

अकोला जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ चा थाटात समारोप

 

 

पोलिस दलातील शिस्त, उत्साह आणि खिलाडूवृत्तीचे मान्यवरांकडून कौतुक

 

अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, २० सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ चा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत पोलीस मुख्यालय, अकोला येथे आयोजित या स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या समारोप कार्यक्रमात विजेते आणि उपविजेते संघांना आणि वैयक्तिक विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.


 

विविध खेळांचा थरार

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि विशेष अतिथी म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त बॉक्सर हरिवंश टावरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये लहान मुलांसाठी ५० आणि १०० मीटर धावण्याची स्पर्धा, अधिकाऱ्यांसाठी रस्सीखेच आणि महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर अकोला पोलीस दलातील सर्व खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन केले.


खेळाडूवृत्तीचे कौतुक

जनरल चॅम्पियनशिपचे विजेतेपद पोलीस मुख्यालय संघाने पटकावले, तर शहर विभाग संघ उपविजेता ठरला.

यावेळी बोलताना हरिवंश टावरी यांनी पोलीस दलाच्या शिस्तबद्धतेचे कौतुक केले. ते म्हणाले, “पोलीस दल केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारे नसून, समाजात सकारात्मक ऊर्जा देणारे आदर्श आहेत. खेळांमुळे शरीरात चैतन्य आणि कामात उत्साह निर्माण होतो. अशा स्पर्धांमुळे पोलीस दलाची तंदुरुस्ती आणि बांधिलकी अधिक मजबूत होईल.”

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनीही खेळाडूंचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “पोलीस दलाचे काम कठीण असते, अशा वेळी अशा स्पर्धांमुळे शारीरिक तंदुरुस्ती आणि संघभावना वाढीस लागते.” त्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमासाठी राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके, गुलाब पाटणकर आणि गेम इन्चार्ज रवी ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी केले, तर सूत्रसंचालन पोलीस हवालदार गोपाल मुकुंदे यांनी केले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!