news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड वाहतूक समस्येमुळे पुन्हा अपघात!

वाहतूक समस्येमुळे पुन्हा अपघात!

रहाटणी-काळेवाडी रस्त्यावर बेजबाबदारपणाचा बळी; प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

काळेवाडीमध्ये सिमेंट मिक्सरने घेतला जेष्ठ महिलेचा बळी

 

 

रहाटणी-काळेवाडी रस्त्यावर दुर्दैवी अपघात; बेजबाबदार वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये संताप

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीच्या समस्येमुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. रहाटणी-काळेवाडी रस्त्यावर डी-मार्टसमोर सिमेंट मिक्सरच्या टँकरखाली येऊन एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजश्री चंद्रशेखर आहेर (वय ६८) असे मयत महिलेचे नाव आहे. या अपघातात त्यांचे पती चंद्रशेखर आहेर यांच्या हातालाही दुखापत झाली आहे.


नेमका अपघात कसा झाला?

हा अपघात दुपारी ३:४५ ते ४:०० च्या सुमारास घडला. राजश्री आहेर आणि त्यांचे पती चंद्रशेखर आहेर हे दोघे दुचाकीवरून डी-मार्टमधून सामान घेऊन चिंचवडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या सिमेंट मिक्सर टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली.

 


पोलिसांची तातडीची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पीआय बहिरट यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी संबंधित ड्रायव्हर आणि सिमेंट मिक्सर टँकर ताब्यात घेतला असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल संताप

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. रात्री काळेवाडी भागात दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असा आरोप नागरिक करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन यावर कुठलेही लक्ष देत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, विक्रांत वाईन शॉपजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमुळेही या भागात अनेक वेळा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!