news
Home पिंपरी चिंचवड एका सूचनेवर काम सुरू: माता रमाईंचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा

एका सूचनेवर काम सुरू: माता रमाईंचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने स्मारकाचा विषय मार्गी; समाजाच्या मागणीला तातडीने प्रतिसाद. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

माता रमाई स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी; अजित पवारांनी घेतला पुढाकार

 


 

आयुक्तांसोबत समितीची बैठक; जागेवर इतर कोणतेही बांधकाम होणार नाही, प्रशासनाचे आश्वासन

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, २५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेचा विषय गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समितीने केलेल्या विनंतीनंतर त्यांनी तातडीने बैठक आयोजित करून या प्रश्नाला गती दिली आहे.


 

अजित पवारांची तातडीची सूचना

 

२१ सप्टेंबर रोजी समितीच्या सदस्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. स्मारकाच्या जागेवरील इतर आरक्षणे काढून टाकून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवारांनी लगेचच त्यांचे स्वीय सहाय्यक विकास पाटील यांना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत समितीची बैठक लावण्याची सूचना दिली. त्यानुसार, आज २४ सप्टेंबर रोजी विकास पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.


 

आयुक्तांचे महत्त्वाचे आश्वासन

 

या बैठकीत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी समितीला महत्त्वाचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, २५ गुंठे जागा पूर्णपणे माता रमाई उद्यानासाठीच आरक्षित असून, त्यावर केवळ स्मारक उभारले जाईल. ‘इतर पर्पज’ किंवा पाच मजली इमारतीसारखे कोणतेही बांधकाम तिथे होणार नाही. तसेच, ठाणे महापालिकेने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी करून, त्या धर्तीवर अधिक भव्य आणि दिव्य स्मारक उभारण्यासाठी समितीसोबत पुढील चर्चा केली जाईल असेही आयुक्तांनी सांगितले. ही सर्व कार्यवाही अजित पवारांच्या सूचनेनुसार केली जात असल्याचे विकास पाटील यांनी स्पष्ट केले.

या आश्वासनामुळे स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याचे समितीने म्हटले आहे, मात्र समाजाची दिशाभूल करून जागेचा इतर कारणांसाठी वापर केल्यास अजित पवार आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!