स्फोटाचं केंद्र! ‘छावा’च्या पुढाकाराने गॅस चोरीचा गोरखधंदा उघड; पिंपरी-चिंचवडमध्ये जीवाशी खेळ!
ऑक्टोबरला आळंदीजवळ कारवाई; – किलो सिलेंडरमध्ये अवैध रिफिलिंग करून वाढीव दराने विक्री; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे धोका वाढल्याचा संघटनेचा आरोप.
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंगच्या अत्यंत धोकादायक आणि अवैध गोरखधंद्यावर काल, गुरुवार ( ऑक्टोबर ) रोजी सकाळी छावा संघटनेने पुढाकार घेत कारवाई केली. या कारवाईत गॅसची मोठी चोरी पकडण्यात आली असून, संबंधितांवर आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छावा संघटनेचे प्रमुख धनाजी येळकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संपर्क प्रमुख गणेश सरकटे पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे यांनी ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईत आकाश खडके, सचिन भिसे, गणेश शेलार आणि संदेश चोपडे यांनी सहभाग घेतला.

नेमका काय आहे गोरखधंदा?
आरोपी शेंडगे नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अवैध आणि बेकायदेशीर पद्धतीने गॅस रिफिल करत होता. मोठ्या घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या ते किलो सिलेंडरमध्ये गॅस भरून तो वाढीव दराने विकला जात होता.
छावा संघटनेने या प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, अशा अवैध गॅस रिफिलिंगच्या घटनांमध्ये स्फोट होऊन आत्तापर्यंत कित्तेक निरपराध लोकांचे बळी गेले आहेत.

प्रशासकीय निष्क्रियतेवर तीव्र टीका
या अवैध धंद्यांवर संघटनेने तीव्र टीका केली आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळात आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून अशा अवैध धंद्यांवर ‘सुमोटो’ (स्वयंप्रेरणेने) कारवाया केल्या जात होत्या. मात्र, त्या कारवाई आता बंद झाल्या आहेत.
“यामुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे उखळ पांढरे होत आहे आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये राजरोसपणे हे स्फोटाचे केंद्र चालू आहेत,” असे मत छावा संघटनेने व्यक्त केले.
छावा संघटनेचा इशारा:
लोकांचे जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते आणि थोडा काळ हे धंदे बंद केल्यासारखे होतात, पण नंतर ते पुन्हा सुरू राहतात. हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिस प्रशासन आणि अन्न, पाणी व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून हे धोकादायक प्रकार थांबवलेच पाहिजेत. छावा संघटनेच्या वतीने यापुढेही यावर आवाज उठवत हस्तक्षेप करून कारवाया चालूच राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
