news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड ‘केवळ घोषणा नको, महामंडळ हवे!’ वृत्तपत्र विक्रेता दिनी कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा सरकारवर हल्लाबोल

‘केवळ घोषणा नको, महामंडळ हवे!’ वृत्तपत्र विक्रेता दिनी कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा सरकारवर हल्लाबोल

'मिसाईल मॅन' डॉ. कलाम यांच्या प्रेरणेतून विक्रेत्यांचा गौरव; रात्री-अपरात्री जगाची खबर देणाऱ्या कष्टकरी वर्गाला योग्य मान मिळण्याची गरज. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ त्वरित करा!’ – कामगार नेते काशिनाथ नखाते यांची सरकारकडे मागणी

 


 

डॉ. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान; ३० वर्षांपासून सेवा देणाऱ्या विक्रेत्यांना शुभेच्छा

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १५ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारतरत्न, मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरी केली जाते. डॉ. कलाम यांच्या प्रेरणेतून साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान केला आणि मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या.

 

सरकारच्या घोषणेवर टीका

 

यावेळी बोलताना काशिनाथ नखाते यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “साधारण मध्यरात्री अडीच, तीन वाजल्यापासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत, तांबडं फुटायच्या वेळेला रस्त्यावर गर्दी नसताना सायकलवरून आणि आता दुचाकीवरून घरोघरी जगाची खबर पोहोचवणाऱ्या या कष्टकरी वर्गाला योग्य मान मिळणे गरजेचे आहे.”

नखाते यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळ स्थापन करण्याच्या सरकारच्या अनेक वर्षांपासूनच्या घोषणेवर तीव्र टीका केली. “सरकारने अनेक वेळा महामंडळ करू, प्रत्यक्षात आणू अशा घोषणा करून केवळ त्यांच्या तोंडाला पाणी पुसले. प्रत्यक्षात महामंडळ अस्तित्वात आलेच नाही,” असे ते म्हणाले.

तातडीने महामंडळ स्थापन करण्याची मागणी

 

या वृत्तपत्र विक्रेत्यांसह सर्वच असंघटित कामगारांचे महामंडळ हे त्वरित करणे गरजेचे आहे. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले.

यावेळी नखाते यांनी २५ ते ३० वर्षांपासून वृत्तपत्र विक्री करणारे सुरेश (नाना) खाटोकार आणि राजू कासट यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सत्कार केला व मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!