news
Home अमरावती SC विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घ्या! – महाडीबीटी प्रणालीवर तातडीने अर्ज भरण्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन

SC विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घ्या! – महाडीबीटी प्रणालीवर तातडीने अर्ज भरण्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी Online अर्ज प्रक्रिया सुरू; मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे प्रोफाइल अद्ययावत करण्याचे बंधनकारक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

SC विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; शाळांना महाडीबीटीवर नोंदणीचे निर्देश

 


 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसह विविध योजनांसाठी Online प्रणाली कार्यान्वित

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १७ ऑक्टोबर २०२५ , मॅक्स मंथन डेली न्यूज: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती SC च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी शैक्षणिक वर्ष  २०२५२६  साठी ऑनलाईन महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी केले आहे.
या महत्त्वाच्या योजनांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
  1. मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती: इयत्ता ९ वी आणि १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी.
  2. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती: इयत्ता ९ वी आणि १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
  3. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती: इयत्ता ५ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींसाठी.
  • नोंदणी: या योजनांचे अर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापकांनी http://prematric.mahait.org/Login, http://prematric.mahait.org/Login या महाडीबीटी प्रणाली वेब लिंकवर मुख्याध्यापक लॉगीन वापरून नोंदणी करावी.
  • प्रोफाइल अद्ययावत करणे: मुख्याध्यापकांनी शाळेचे, मुख्याध्यापकांचे आणि लिपीकांचे प्रोफाइल तसेच विद्यार्थ्यांचे वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचे प्रोफाइल तातडीने अद्ययावत करणे आवश्यक आहे.
  • अर्जाची पूर्तता: महाडीबीटी प्रणालीमध्ये पात्र असलेल्या सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची नोंदणी मुख्याध्यापकांनी करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, असे निर्देश श्री. पुंड यांनी दिले आहेत.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!