news
Home पुणे दिवाळी फराळातून रिपब्लिकन सेनेने साधला पत्रकारांशी संवाद; पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांचे यशस्वी आयोजन

दिवाळी फराळातून रिपब्लिकन सेनेने साधला पत्रकारांशी संवाद; पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांचे यशस्वी आयोजन

पुणे जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, शंकर गायकवाड, मुकुंदराव रणदिवे, संजय ठोंबे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उत्साहपूर्ण वातावरणात रिपब्लिकन सेनेचा स्नेह मेळावा संपन्न!

 


 

सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड, मावळ लोकसभा क्षेत्रातील पत्रकार व पदाधिकाऱ्यांचा फराळ कार्यक्रम

 

पिंपरी, पुणे , दि. २१ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ लोकसभा रिपब्लिकन सेनेच्या वतीने पत्रकार बंधू-भगिनींचा, तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी (दि. २० ऑक्टोबर २०२५) पिंपरी येथे संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी निमंत्रित केलेल्या या स्नेह मेळाव्यात व पत्रकार बंधू-भगिनींच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधण्यात आला.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. तसेच, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले,  उपाध्यक्ष महावीर जाधव, डिजिटल मीडिया अध्यक्ष विनय सोनवणे, संजय सूर्यवंशी.मारुती बानेवार, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे.
रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी:
पुणे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) दीपक जगताप, मावळ लोकसभा युवक अध्यक्ष शंकर गायकवाड जेष्ठ नेते तथा प्रदेश सदस्य मुकुंदराव रणदिवे,प्रभारी पिंपरी चिंचवड शहर संजय ठोंबे,युवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर दयानंद सरवदे , महासचिव आनंद नरवाडे, उपाध्यक्ष संतोष उबाळे,उपाध्यक्ष सचिन सोनकांबळे, उपाध्यक्ष शेखअली पठाण, सचिव रणजीत घोबाळे, संघटक रमेश कांबळे, महिला अध्यक्षा (महिला आघाडी पुणे जिल्हा) श्रुती मराठे, गणेश शिरसागर, सागर जेठीथोर, दीपक आल्हाट, समाधान सरवदे, दीपक गुडगुडे, यावेळी पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधीही उपस्थित होते, कार्यक्रमाचे स्वागत गुलाब पानपाटील यांनी केले, तर आभार दीपक जगताप यांनी मानले.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!