news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home मुख्यपृष्ठ पुण्यात ‘गोडवा’चा वर्ल्ड रेकॉर्ड! – १५० किलो बेसन आणि ३०० किलो साखरेपासून बनला ६१० किलोचा मोतीचूर लाडू; ‘चंद्रकांतदादा पाटील’ यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान

पुण्यात ‘गोडवा’चा वर्ल्ड रेकॉर्ड! – १५० किलो बेसन आणि ३०० किलो साखरेपासून बनला ६१० किलोचा मोतीचूर लाडू; ‘चंद्रकांतदादा पाटील’ यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान

अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि समृद्धी केटरर्सचा उपक्रम; लाडूचे चार अनाथ आश्रमांमध्ये वितरण. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

विश्वविक्रमी ‘गोडवा’! ६१० किलोचा मोतीचूर लाडू बनवून पुण्यात अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी नोंद!

 


 

दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेरमध्ये महाकाय लाडूची निर्मिती; ‘सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू’ म्हणून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

 

पुणे / बाणेर, दि. २६ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

 

पुण्यातील बाणेर येथे दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि समृद्धी केटरर्सने एक अनोखा विश्वविक्रम रचला आहे. बाणेर येथील रायकर फार्म येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करण्यात आला, ज्याची नोंद “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून Winners Book of World Records मध्ये करण्यात आली आहे.
हा महाकाय लाडू तयार करण्यासाठी प्रचंड सामग्रीचा वापर करण्यात आला.
  • १५० किलो बेसन
  • ३०० किलो साखर
  • १५० किलो तूप
या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी Winners Book of World Records च्या चेअरमन, अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा केली.
मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आले:
  • १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय, बी.के. डॉ. दीपक हरके
  • प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. त्रिवेणी
  • समृद्धी केटरर्स चे संचालक जालिंदर वाळके पाटील
अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून हा उपक्रम समाजात प्रेम, ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. हा तयार झालेला ६१० किलोचा लाडू त्यानंतर शहरातील चार अनाथ आश्रमांमध्ये वितरित करण्यात आला.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!