news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड १५ वर्षांचा मास्टर प्लॅन! – वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला महत्त्वाचा आदेश

१५ वर्षांचा मास्टर प्लॅन! – वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा महापालिकेला महत्त्वाचा आदेश

आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप बैठकीला उपस्थित; पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या कामांना गती देण्यावर भर.(© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना! पिंपरी-चिंचवडसाठी १५ वर्षांचा नियोजन आराखडा तयार करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

 


 

पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेच्या कामांचा घेतला आढावा; खड्डे दुरुस्ती, सांडपाणी पुनर्वापर आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या सूचना

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ७ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी महापालिकेने आगामी १५ वर्षांचा विचार करून दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करावा, असे महत्त्वपूर्ण निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधले. भविष्यात ही समस्या गंभीर होऊ नये, यासाठी:

  • दीर्घकालीन नियोजन: पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
  • तात्काळ उपाययोजना: तात्काळ उपाययोजनांसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून सिग्नल दुरुस्तीसह वाहतूक नियोजनासाठी इतर उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वाहतूक व्यवस्था, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि आरोग्य व्यवस्था या कामांचा सखोल आढावा घेतला आणि अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या:

  • कामांना गती: कचरा, सांडपाणी, वाहतूक यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना गती देण्यात यावी.
  • दुरुस्ती: रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.
  • जलपुनर्वापर: सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर विशेष भर द्यावा.
  • अतिक्रमणमुक्त फूटपाथ: फूटपाथ अतिक्रमणमुक्त राहतील, यासाठी सुयोग्य नियोजन करावे.

 

या बैठकीला आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर राहूल जाधव, नितीन काळजे, माजी नगरसदस्य नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, विकास डोळस, ॲड. मोरेश्वर शेडगे, निगडी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रविण जैन, शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना व विकास विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंते मनोज शेठीया, अनिल भालसाखळे, सहा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, उपायुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, पंकज पाटील, ममता शिंदे, राजेश आगळे, संदीप खोत, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, उमेश ढाकणे, अतुल पाटील, अमित पंडित, अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, किशोर ननावरे, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, राजाराम सरगर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!