news
दिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासनपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली मर्सिडीज कंपनीत उद्योजक व पोलीस विभागाचे भव्य समन्वय चर्चासत्रकृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाईपत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
Home पिंपरी चिंचवड तरुणांच्या तांत्रिक कौशल्याचा आणि नवोन्मेषी कल्पनांचा सन्मान; समाधान नरळे यांना २५ हजारांचे प्रथम पारितोषिक

तरुणांच्या तांत्रिक कौशल्याचा आणि नवोन्मेषी कल्पनांचा सन्मान; समाधान नरळे यांना २५ हजारांचे प्रथम पारितोषिक

हॅकेथॉन स्पर्धेत समाधान नरळे प्रथम; स्मार्ट अन् नागरिकाभिमुख शहरासाठी महापालिका नवसंकल्पनांना देणार पाठबळ | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हॅकेथॉन २०२५ च्या विजेत्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते गौरव!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हॅकेथॉन २०२५’ या भव्य स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील उपमहापौर कार्यालयात अत्यंत उत्साहात पार पडला. शहराच्या शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधणाऱ्या तरुण विजेत्यांना यावेळी गौरविण्यात आले.

या हॅकेथॉन स्पर्धेत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरी समस्यांवर उत्कृष्ट उपाय मांडणाऱ्या खालील विजेत्यांचा रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक (२५,००० रुपये): समाधान नरळे, द्वितीय क्रमांक (१५,००० रुपये): करण कदम (अनुपस्थितीमुळे पालकांनी स्वीकारले), तृतीय क्रमांक (१०,००० रुपये): कु. मृण्मयी सावंत (अनुपस्थितीमुळे पालकांनी स्वीकारले)

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या:
“हॅकेथॉनसारख्या स्पर्धा या तरुणांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला योग्य दिशा देणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. शहराच्या विविध नागरी समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक उपाय शोधण्याची अथांग क्षमता आपल्या युवकांमध्ये आहे. अशा स्पर्धांमुळे नवोन्मेषी विचारांना चालना मिळते आणि भविष्यातील अधिक सक्षम, स्मार्ट व नागरिकाभिमुख शहर उभारण्यास निश्चितच मदत होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना सातत्याने पाठबळ देईल.”

या गौरव सोहळ्या प्रसंगी नगरसेविका योगिता नागरगोजे, उप-आयुक्त पंकज पाटील, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, दीपक पवार, रमेश आवटे, हेमंत घाडगे, उज्वला करपे, सुनीता चौगुले, संजय जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भालेराव यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
महापालिकेच्या विविध नागरी सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक आणि सुलभ वापर वाढवण्यासाठी तसेच नागरिककेंद्रित नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा हॅकेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!