news
दिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौडशहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे महापौरांचे आश्वासनपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली मर्सिडीज कंपनीत उद्योजक व पोलीस विभागाचे भव्य समन्वय चर्चासत्रकृत्रिम फ्लेव्हर्सचा (Artificial Flavours) वापर ठरला कारण; अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याने अन्न सुरक्षा प्राधिकरणाची धडक कारवाईपत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा भाग दान करत वाचवला पतीचा जीव; तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
Home पिंपरी चिंचवड सभापती बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार; अत्यावश्यक सेवा अखंडित ठेवण्यासह खेळाडूंच्या शिष्यवृत्तीत वाढ

सभापती बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार; अत्यावश्यक सेवा अखंडित ठेवण्यासह खेळाडूंच्या शिष्यवृत्तीत वाढ

वायसीएम रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे नाव महापालिका सभेकडे; 'आपदा मित्रां'च्या मानधनासह क्रीडा, स्वच्छतेला स्थायीची हिरवी झंडी | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी; पशुवैद्यकीय, क्रीडा, शिक्षण आणि आपत्कालीन सेवांबाबत मोठे निर्णय!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा सभापती बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या सभेत शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानाशी निगडित असलेले पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय सेवा, क्रीडा प्रोत्साहन, सार्वजनिक स्वच्छता, शिक्षण व आरोग्यविषयक विविध महत्त्वाकांक्षी विषयांना आणि विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

पशुरुग्णालयातील पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरावेट कर्मचारी व आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याच्या सेवेला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यामुळे पशुरुग्णालय, निसर्गकवी बाफणा प्राणिसंग्रहालय तसेच भटक्या प्राण्यांवरील अत्यावश्यक उपचार सेवा सुरळीत सुरू राहतील.  महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती निधीत वाढ करण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यास आणि कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या देखभालीला मुदतवाढ देण्यात आली.  यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य इमारतीस नाव देण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महापालिका सर्वसाधारण सभेकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरात मदतकार्यासाठी तैनात करण्यात आलेल्या ‘आपदा मित्र’ व ‘ट्रेनी फायरमन’ यांच्या मानधनासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील आपत्ती व्यवस्थापन पंपांच्या संचालनाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते, बीआरटी (BRT) रेलिंग, फुटपाथ दुरुस्ती तसेच महापालिकेच्या विविध विभागांसाठी आवश्यक साहित्य खरेदीस मान्यता देण्यात आली. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालये व मुताऱ्यांची आधुनिक यांत्रिक पद्धतीने सफाई करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

“महापालिकेच्या सर्व अत्यावश्यक व नागरी सेवा कोणत्याही परिस्थितीत अखंडित राहाव्यात, शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात आणि क्रीडा, शिक्षण, आरोग्य तसेच लोकाभिमुख उपक्रमांना ताकद मिळावी, या उद्देशानेच आज विविध विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना दर्जेदार आणि वेळेत सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या प्रत्येक कामाला स्थायी समितीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल.”
बाबासाहेब त्रिभुवन, सभापती, स्थायी समिती (पिंपरी-चिंचवड महापालिका)
स्थायी समितीने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयांमुळे शहराच्या पायाभूत विकासासह आरोग्य, स्वच्छता आणि क्रीडा क्षेत्राला नवीन उर्जित अवस्था मिळणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!