संविधानाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! न्यू सिटी प्राईड आणि महर्षी विद्यामंदिरकडून संविधान दिन उत्साहात साजरा
संविधान दिंडी, घोषणा आणि सामूहिक उद्देशिका वाचनाने परिसर दुमदुमला; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल आणि महर्षी विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन (२६ नोव्हेंबर) अतिशय उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नव्या पिढीला समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार आणि धर्मराज पाल सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, महर्षी विद्यामंदिरच्या उपमुख्यध्यापिका श्वेता साहू मॅडम, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अरुण तांबे, मा. पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, काळेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पारधी, वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश उंदिरवाडे (बोधी), पुरुषोत्तम गाणार, आनंद बौद्ध बिहारचे महादेव कांबळे, बंशी शिंदे, भारतीय दलीत पँथरचे बाळासाहेब शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, युवराज प्रगने, सुधीर दुधमल, हर्षवर्धन कांबळे, शशिकांत शेलार, रामनाथ उगले, राजेंद्र खडसे, वाय. डी. वाघमारे, डी. स. कोरे, भाऊरावकर दहागावकर, आर. डी भालेराव, बाजीराव भालेराव, महर्षी विद्यामंदिरच्या ॲडमिन डिपार्टमेंटचे स्वप्नील पाल तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेतर्फे भव्य संविधान दिंडी (रॅली) काढण्यात आली. शाळा ते छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक, विमल गार्डन, कोकणे चौक मार्गे पुन्हा शाळा असा दिंडीचा मार्ग होता.
यावेळी दोन्ही शाळांचे पहिली ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात संविधानाच्या घोषणा दिल्यामुळे सगळा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.
-
निशा पवार यांनी मराठीमध्ये संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
-
संविधानावर आधारित इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी नाटक बसवले होते, ज्यामुळे संविधानातील मूल्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले गेले.
-
संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
-
उपस्थितांनी सामूहिक उद्देशिकेचे (Preamble) वाचन करून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केली.
याचबरोबर, २६/११ मुंबई अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी वाघमारे आणि सारिका देशमुख यांनी केले, तर चेतना देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
