news
Home पिंपरी चिंचवड संविधान दिनानिमित्त नवी सांगवीतील शालेय विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

संविधान दिनानिमित्त नवी सांगवीतील शालेय विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

जालिंदर सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; अरुण पवार, महेश भागवत, कल्पना सोनवणे, सुखदेव चोरमले यांची प्रमुख उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भारतीय संविधान राष्ट्रीय एकात्मतेने ओतप्रोत! ‘तथागत’ संस्थेकडून नवी सांगवीत सामूहिक उद्देशिका वाचन

 

माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांचा युवा विद्यार्थ्यांना कानमंत्र; शालेय विद्यार्थ्यांना नवीन कपडे वाटप

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नवी सांगवी येथे विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांनी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांवर प्रकाश टाकत युवा विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण संदेश दिला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने जनता शिक्षण संस्थेच्या नवी सांगवीतील मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संस्थेतर्फे यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कपडे व पेन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ. एस. एन. पठाण यांच्या हस्ते संविधान उद्देशिका प्रतिमा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालिंदर सरवदे होते.

डॉ. एस. एन. पठाण यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय राज्यघटना ही राष्ट्रीय एकात्मतेने ओतप्रोत भरलेली आहे. देशाच्या युवा विद्यार्थ्यांनी संविधानातील ही महान तत्त्वे अंगीकारल्यास आपला देश निश्चितपणे महासत्ता होईल. याचे संपूर्ण श्रेय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.

या कार्यक्रमाला मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे, संयम निकाळजे, सुखदेव चोरमले, रवींद्र पारघे, मुरलीधर दळवी, कृष्णा शिंदे, सुरेश सकट, गौतम डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण भागवत यांनी केले, संतोष नवले यांनी सूत्रसंचालन केले, तर मगन सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप शेलार, गुलाब गायकवाड, सुरेंद्र जाधव, चंद्रकांत कांबळे, भाऊ शिंदे, अशोक बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!