news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ‘नवीन कार्यकारिणी, नवीन दिशा’! पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाची पहिली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

‘नवीन कार्यकारिणी, नवीन दिशा’! पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाची पहिली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

शहर अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे आणि संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांचे मार्गदर्शन; अजित अरुण कुलथे यांनी दिली 'काॅफी विथ युथ' अभियानाची माहिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजयुमो सज्ज! युवाशक्तीला संधी देण्यासाठी ‘विजयाचा शंखनाद’

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी; युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांचा ‘अबकी बार १०० पार’चा नारा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला भारतीय जनता पार्टीचा (भाजप) युवा मोर्चा (भाजयुमो) पूर्ण ताकदीने लागला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी नवीन तरुणांना भारतीय जनता पार्टी संधी देणार असल्यामुळे, शहरातील सर्व तरुण कार्यकर्ते निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत.

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे हे स्वतः युवा कार्यकर्ते असल्यामुळे, शहरातील भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

भाजपा शहर कार्यालयात पिंपरी-चिंचवड भाजयुमोच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची पहिली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत “विजयाचा शंखनाद..! युवा मोर्चाचा अभेद्य संकल्प..! नवीन कार्यकारिणी, नवीन दिशा..!” या संकल्पासह प्रदेश स्तरावरील आगामी उपक्रमांसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. शहरात युवाशक्तीला प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली.

  • वरिष्ठांचे मार्गदर्शन: यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे   आणि संघटन सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे

  • यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांशी प्रभावीपणे संपर्क साधावा आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने गतकाळात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

  • युवा संपर्क अभियान: युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित अरुण कुलथे यांनी प्रदेशातून आलेल्या ‘युवा संपर्क अभियान’ या आगामी काळातील युवकांशी निगडित ‘काॅफी विथ युथ’ या महत्त्वाकांक्षी अभियानची माहिती सर्व पदाधिकाऱ्यांना दिली.

युवा मोर्चा शहर अध्यक्ष  दिनेश लालचंद यादव  यांच्या वतीने यावेळी ‘अबकी बार १०० पार’ चा नारा देत, युवा मोर्चा मोठ्या ताकदीने आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोमाने काम करेन, असे आश्वासन वरिष्ठांना देण्यात आले.

या प्रसंगी पुर्व युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, राज तापकीर, युवा मोर्चा सरचिटणीस प्रसाद कस्पटे, राहुल खाडे, उदय गायकवाड, सुमित घाटे, दिनेश काटे पाटील, गणेश सस्ते, सम्यक साबळे यांच्या सह सर्व नवनियुक्त शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!