प्रभाग २२ च्या विकासाला नवी दिशा देणार! सामाजिक कार्यकर्त्या सौ. मोनिका नवनाथ नढे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक
सामाजिक कार्यामुळे महिला व नागरिकांमध्ये मोठी लोकप्रियता; राष्ट्रवादीचे निष्ठावान नवनाथ नढे यांचा खंदा पाठिंबा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ८ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यामुळे संपूर्ण शहरात इच्छुक उमेदवारांची चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. मोनिका नवनाथ नढे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक नागरिक यावेळी नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे, ज्यामुळे सौ. मोनिका नवनाथ नढे यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सौ. मोनिका नवनाथ नढे यांनी प्रभागात सामाजिक आणि धार्मिक कार्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दूर केल्या आहेत. प्रभागातील महिलांसाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजना, सामाजिक कार्यक्रम, महिलांसाठी मनोरंजन आणि खेळ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
त्यांच्या पुढाकाराने प्रभागात जयंती उत्सव, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, अन्नदान वाटप, महिलांचा सन्मान सोहळा, सण उत्सव, कीर्तन सोहळा, नवरात्र उत्सव आणि अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रभाग क्रमांक २२ मधील विजयनगर, पवना नगर, आदर्श नगर, नढे नगर आणि काळेवाडी येथील नागरिकांनी म्हटले आहे की, येणाऱ्या निवडणुकीत ते नवीन चेहऱ्याला संधी देणार आहेत. जनतेचे नेतृत्व करणारा, विकासकामे करणारा आणि समस्या सोडवणारा नगरसेवक यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडून दिला जाईल.
माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे यांनीही प्रभागात सामाजिक कार्याच्या माध्यमातून विकास कामे व सामाजिक बांधिलकी जपत लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. नवनाथ नढे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत असून विरोधी पक्ष नेते नाना काटे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या राजकीय पाठिंब्यामुळे सौ. मोनिका नवनाथ नढे यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची चर्चा आहे.
प्रभागातील नागरिक आणि ‘माय माऊली’ सौ. मोनिका नवनाथ नढे यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान करून प्रभागातील सेवा करण्याची संधी देणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही सौ. मोनिका नवनाथ नढे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
