news
परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानामुळे पासपोर्टच्या वैधतेवर देशात मोठा गदारोळ; विरोधी पक्षांचा थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा!जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा चालणार; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून ‘अ’ प्रभाग अधिकाऱ्यांना थेट आदेश!औद्योगिकनगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांना पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात भावपूर्ण आदरांजली!भोसरी विधानसभा मतदारसंघात ३० जूनपासून विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहीम; ४८३ ‘BLO’ करणार घरोघरी जाऊन तपासणी!पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचा विकासकामांचा धडाका; निगडी अतिरिक्त मेट्रो स्थानक निधीसह पुनावळे फायर स्टेशनला मंजुरी!
Home पिंपरी चिंचवड ‘वंदे मातरम’ने दिला राष्ट्रधर्माचा संदेश! आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या दोन दिवसीय सोहळ्याला चैतन्यात सुरुवात

‘वंदे मातरम’ने दिला राष्ट्रधर्माचा संदेश! आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या दोन दिवसीय सोहळ्याला चैतन्यात सुरुवात

अपेक्षा न ठेवता जगण्यातच खरा आनंद; प्रमुख पाहुणे जिजाराम शिंदे यांचे मार्मिक मार्गदर्शन, 'स्वत्व' स्मरणिकेचे दिमाखात प्रकाशन. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवडमध्ये ‘वंदे मातरम’च्या जयघोषात रंगला ‘आनंद’ सोहळा! ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात; ‘स्वत्व’ स्मरणिकेचे प्रकाशन


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या दोन दिवसीय वर्धापनदिन सोहळ्याला शुक्रवारी (दि. ६) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. देशभक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीने न्हाऊन निघालेल्या या पहिल्या दिवशी स्मरणिका प्रकाशन, व्याख्यान आणि देशभक्तीपर गीतांच्या गायनाने सभासदांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले प्रसिद्ध व्याख्याते तुकाराम चिंचणीकर यांनी ‘वंदे मातरम’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. “कोणताही समाज नष्ट करायचा असेल, तर त्यांची शिक्षण पद्धती नष्ट करायला हवी, हे ब्रिटिशांनी जाणले होते. मात्र, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताने संपूर्ण देशाला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली,” असे त्यांनी नमूद केले. या प्रेरणेतूनच संघाच्या सभासदांनी ‘वंदे मातरम’ संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर आणि त्यांचे शिष्य प्रमुख पाहुणे यादवराव शिंदेजिजाराम शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक राजू गोलांडे, उपाध्यक्ष अशोक नागणे आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे जिजाराम शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांना जीवनाचा कानमंत्र देताना सांगितले की, “तुम्ही जितके निरिच्छ व्हाल, तितके जास्त समाधान तुम्हाला मिळेल. मित्र आणि नातेवाईकांसाठी सर्वकाही करा, पण त्याबदल्यात कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. अपेक्षाभंग झाला नाही की पश्चातापाचे दुःख होत नाही.”

यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघाच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याकामी परिश्रम घेणारे संपादक माधव जोशी, उपसंपादक अश्विनी कोटस्थाने आणि संपादकीय मंडळाचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी केला, तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या उत्साहामुळे चिंचवड परिसर भारावून गेला होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!