news
पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न सुटणार! महापौरांकडून चिखली आणि निगडी प्रकल्पांचे ‘ऑन ग्राऊंड’ इन्स्पेक्शन‘कल्चर क्रेस्ट’मध्ये आता प्रशासक राज! उपनिबंधकांकडून विद्यमान समिती बरखास्त; सभासदांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाची मोठी कारवाईहक्काचे पाणी हिरावले! एकट्या विधवा महिलेला पाहून देशमुखांची बोअरवेलवर जबरदस्ती; “जे करायचे ते कर” म्हणत दिली जीवे मारण्याची धमकीविचारांच्या लढाईत शस्त्राचे काय काम? दिव्या शिंदे यांच्या ‘त्या’ विधानामुळे कायदेशीर संकट ओढवणार; तरुणाईने सावध राहण्याची गरज“गुन्हेगारी सोडली नाही, तर शहर सोडावे लागेल!”; सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई
Home पिंपरी चिंचवड “गुन्हेगारी सोडली नाही, तर शहर सोडावे लागेल!”; सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई

“गुन्हेगारी सोडली नाही, तर शहर सोडावे लागेल!”; सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई

२० ते २७ वयोगटातील गुंडांचा तडीपारीत भरणा; महिला गुन्हेगारांचाही समावेश असलेल्या टोळीवर परिमंडळ २ कडून 'मिशन मोक्का' नंतरचा मोठा प्रहार. (© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! परिमंडळ २ मधील महिलांसह ९ सराईत गुन्हेगार तडीपार; रावेत आणि थेरगाव परिसरात खळबळ


 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले ७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी-चिंचवड : शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ २ मधील ९ सराईत गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकाच टोळीतील सहा सदस्यांचा समावेश असून, त्यात महिला गुन्हेगारांचाही समावेश आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची माहिती:

१) मारवाडी टोळी (एकूण ६ सदस्य): रावेत येथील ‘आयशारामा’ सोसायटीजवळ दहशत माजवणारी ही टोळी तडीपार करण्यात आली आहे.

  • प्रेम समुंदर मारवाडी (वय २७, टोळी प्रमुख)

  • अविनाश बरमा मारवाडी (वय ४५)

  • पायल बलबीर कर्मावत (वय २५)

  • उर्मिला विष्णू कर्मावत (वय २३)

  • निर्जना प्रेम मारवाडी (वय २७)

  • नेहा सागर कर्मावत (वय २१)

२) इतर सराईत गुन्हेगार:

  • आकाश चंद्रवदन जगदाळे (वय ३०, रा. जय मल्हार नगर, पिंपरी): याला ३ ते ६ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

  • अक्षय चिमाजी ढवळे (वय २३, रा. कैलासनगर, थेरगाव): याला ३ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेले बहुतांश गुन्हेगार हे २० ते २७ वयोगटातील आहेत. त्यांच्यावर मारामारी, दहशत माजवणे आणि चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जानेवारी २०२६ मध्ये परिमंडळ २ हद्दीत झालेली ही सर्वात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई मानली जात आहे.

पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ २) विशाल गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की, सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ही ठोस कारवाई करण्यात आली आहे. “परिमंडळ २ हद्दीतील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. जर तडीपार केलेले गुन्हेगार शहरात कुठेही आढळले, तर नागरिकांनी तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!