news
संरक्षण क्षेत्रातील संशोधन संस्थांमध्ये करिअरची संधी; १ वर्षाच्या प्रशिक्षणासाठी दरमहा १५,००० रुपये मानधनसंत तुकाराम नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न; हजारोंच्या संख्येने कामगार व श्रमिकांची उपस्थितीगृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तरासाठी सरकारच्या अटी; पंजाब व झारखंडमधील आंदोलनांचाही समावेश करण्याची भूमिकाव्यसनमुक्ती प्रबोधन प्रदर्शन आणि महा. अनिसच्या पंचसूत्रीच्या मांडणीतून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागरस्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष मोहीम; क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गृहभेटींवर भर
Home पिंपरी चिंचवड गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन क्लिन’! परिमंडळ १ मधील १० गुंडांना दाखवला बाहेरचा रस्ता

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे ‘मिशन क्लिन’! परिमंडळ १ मधील १० गुंडांना दाखवला बाहेरचा रस्ता

दहशत माजवणाऱ्या टोळ्यांवर आयुक्तांचा प्रहार; तडीपार गुन्हेगार शहरात आढळल्यास '११२' वर कळवण्याचे पोलीस उप-आयुक्त संदीप आटोळे यांचे आवाहन. (© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका! परिमंडळ १ मधील १० सराईत गुन्हेगार तडीपार; शहर स्वच्छतेसाठी आयुक्त विनय कुमार चौबे यांची मोठी कारवाई


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे,७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, परिमंडळ १ मधील एकूण १० सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५, ५६ आणि ५७ नुसार शहरातून तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची यादी:

अ.क्र. गुन्हेगाराचे नाव पोलीस ठाणे तडीपारी कालावधी
रोहित दत्ता धावरे (वय २०) चिंचवड २ वर्षे
जावेद मुसा कुरेशी (वय ४४) संत तुकारामनगर १ वर्ष
रवी नरसप्पा रेड्डी (वय २८) निगडी १ वर्ष
संतोष उर्फ बंट्या सिद्धू पवार व टोळी (३ सदस्य) निगडी २ वर्षे
गोपाळ अंकुश हळनोर (वय २५) निगडी १ वर्ष
विघ्नेश गुणशिलन रंगम (वय २५) सांगवी १८ महिने
अभिषेक राजू चव्हाण (वय ३२) दापोडी ६ महिने
कार्तिक श्रीनिवास शिंगाडे (वय २१) संत तुकारामनगर १ वर्ष

या कारवाईमध्ये निगडी परिसरातील संतोष उर्फ बंट्या सिद्धू पवार आणि त्याच्या टोळीतील सदस्य करण उर्फ राजू ज्ञानदेव तिरकररामा नंदू कुहाडे यांचा समावेश आहे. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या या गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस उप-आयुक्त (परिमंडल १) संदीप आटोळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “तडीपार केलेले हे गुन्हेगार जर त्यांच्या हद्दपारीच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात कोठेही आढळून आले, तर तात्काळ नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.”

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. “परिमंडळ १ हद्दीतील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल,” असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!